Saturday, 7 December 2019

रसिक बलमा

"मंद असावें जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी
गर्द कुंतली तुझ्या खुलाव्या शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी

सांगावे तूं दु:ख आगळें माझ्यासाठी गिळिलें कैसें
आणि आंधळ्या भलेपणीं मी तुला केधवां छळिलें कैसें"

कविवर्य बोरकरांच्या या श्रुतिमधुर ओळी एकाच वेळी आत्मवंचनेची गहिरी अनुभूती देतात आणि दुसऱ्या अंगाने प्रणयाच्या नखऱ्याचा शाश्वत अनुभव देतात.  अर्थात, असा अनुभव आपल्या काव्यातून, आयुष्यभर हा कवी आपल्याला देत आलेला आहे. प्रेमातील आत्मवंचना हिंदी चित्रपटातील गाण्यांना कधीच नवीन नव्हती. चित्रपट बोलायला लागल्यापासून, आपल्याला याच भावनेची अनंत रूपे पहायला मिळाली आहेत.

हिंदी चित्रपट गीतांत बरीचशी गाणी खूप गाजतात, कालांतराने त्यात काही त्रुटी निदर्शनास येतात आणि मग एकूणच आवड बदलत जाते. अर्थात, कालानुरूप आवड बदलणे, हे साहजिकच असते. या बाबतीत आणखी एक खुळचट समज भरपूर पसरला आहे. गाणे लोकप्रिय असणे, दर्जाच्या दृष्टीने "कमअस्सल" ठरले जाणे. जितके गाणे "दुर्मिळ", तितकी त्या गाण्याची "किंमत" अधिक. आता हा गैरसमज कुणी, कसा पसरवला, याला कसलाच पुरावा देता येत नाही.दुर्मिळ गाणे उत्तम असते, हा देखील चुकीचा समज आहे म्हणा. ते असो, आजचे गाणे त्या काळी देखील लोकप्रिय होते, आजही आहे आणि कदाचित पुढे त्याच्या लोकप्रियतेत घट होईल, असे संभवत नाही. याचाच दुसरा अर्थ असा देखील काढता येतो, सुगम संगीतात अजूनही ठाम निकष असे तयार झाले नाहीत आणि प्रत्येकाची "आवड" याच कसोटीवर गाण्याचा दर्जा ठरवला जातो. खरतर चित्रपट गीतांचे अचूक असे शास्त्र देखील बनले नाही आणि मग त्यात, बरेचवेळा ज्याला निव्वळ बाष्कळ म्हणावे असे विचार प्रचलित होतात. यामागे, असे देखील म्हणता येईल, चित्रपट गीतांना अजूनही, संगीताच्या प्रांगणात सन्माननीय स्थान मिळालेले नाही. 
"चोरी चोरी" चित्रपटातील "रसिक बलमा" हे गाणे आजही अनेक रसिकांच्या आवडीचे आणि म्हणून स्मृतीत ठाण मांडून बसलेले गीत.चित्रपटात हे गाणे, मुख्यत्वेकरून नर्गिसवर चित्रित झाले आहे. नर्गिस, अभिनेत्री या दृष्टीने अत्युत्तम म्हणून कधीच गणली गेली नाही तसेच भारतीय सौंदर्याच्या मापनातून रूपवती देखील मान्य पावली नाही. तरीही, काळाच्या दृष्टीने अत्याधुनिक विचारांची, अभिनयात धिटाई दाखवणारी आणि "ग्रेसफुल" अभिनेत्री म्हणून नक्कीच गणली जाते. बहुतेक चित्रपटात, चावून चोथा झालेला प्रसंग - नायक, नायिकेचा बेबनाव आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक तडफड. या पार्श्वभूमीवर हे गाणे चित्रित झाले आहे. 
संगीतकार शंकर/जयकिशन यांची, या गाण्याला चाल आहे. गाण्याची चाल शुद्ध कल्याण रागावर आधारित आहे. या जोडींचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, त्यांची गाण्याबाबत असलेली चित्रपटीय भाषा. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, आपण चित्रपटातील गाणे तयार करीत आहोत, ही जाणीव त्यांच्या सगळ्या रचनांमधून आपल्याला आढळेल आणि याच दृष्टीने पुढे मांडायचे झाल्यास, या गाण्यातील राग हा केवळ आधार स्वर इतपतच वापरलेला आहे. चाल बांधताना, राग-चौकटीपासून दूर सरकून त्यांनी  इथे काहीतरी आवाहक आणि नवे निर्माण करण्याचा सुजाण प्रयत्न केला आहे आणि त्या दृष्टीने, इथे केलेल्या रागाचा वापर अधिक कलात्मक म्हणायला हवा.       
 शायर हसरत जयपुरी यांची शब्दकळा आहे आणि तशी रचना केवळ दोन कडव्यांचीच आहे पण तरीही कविता म्हणून, गाणे कुठेही घसरत नाही. आपण या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायला हवी. चित्रपटातील प्रसंग हे बहुतांशी एकसाची असतात. असे असून देखील, प्रसंगानुरूप रचना करताना, कवीला प्रत्येकवेळा सृजनात्मक रचना करणे केवळ अशक्य असते, तरी देखील संख्येने बघता, रचनेतील गेयता आणि सृजनता वाखाणण्याइतपत कौतुकास्पद असते. 
शायर म्हणून हसरत जयपुरी  यांचा विचार करायला गेल्यास, त्यांच्या रचना बहुतांशी गेयबद्ध अंगाने केलेल्या दिसतात. अर्थात, जेंव्हा काव्याचे गाण्यात रूपांतरण होते तेंव्हा, स्वररचनेचा आकृतिबंध लक्षात घेऊनच शब्दरचना करणे हे बंधन अत्यावश्यक असते. ललित संगीतातील शब्दरचनेचा जेंव्हा विचार केला जातो तेंव्हा या बंधनाचा विचार पहिल्या पायरीवर करावाच लागतो. चित्रपट गीतांत प्रतिभेची भरारी दिसत नाही (अपवाद म्हणून काही कविता दाखवता येतील पण त्या अपवादात्मकच!!) असा गंभीर आरोप नेहमी केला जातो पण त्या आरोपामागे, ललित संगीताचा ढाचा समजून घेतला गेला नाही, हेच दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. गेयतेबरोबर आशयघनता मिसळण्याची अप्रतिम प्रतिभा या शायरकडे नक्कीच होती.
सारंगीच्या आर्त सुरांतून गाण्याची सुरवात होते आणि आपल्याला शुद्ध कल्याण रागाचे सूर ऐकायला मिळतात. सारंगीचे सूर संपतात, तिथे लता बाईंचा वरच्या सुरांत आवाज लागतो - "रसिक बलमा". गाण्याच्या सुरवातीलाच तार स्वरांत गळा न्यायाचा, ही कधीही सोपी गोष्ट नसते. एकतर या गाणे थोडे बारकाईने ऐकले तर समजेल, "बलमा" या शब्दावरील सुरांनी, पुढील सगळी रचना तोलून धरली आहे. प्रत्येक गाण्यात, अशी एखादी "खास" जागा असते, ती जागा म्हणजे त्या गाण्याची ओळख!! "रसिक बलमा' म्हणताना, स्वर कसा उंचावत जातो, ते न्याहाळणे खरच सुंदर अनुभव आहे. 
त्यानंतरचा " हाये" शब्द देखील असाच अप्रतिम आहे. तडफडत्या ह्रुदयाची भावना, त्या "हाये" शब्दात गुंतलेली आहे. तसेच पुढे "दिल क्यो लगाया" इथे ओळ संपत असताना जीवघेणी हरकत आहे - "लगाया" मधील "या" अक्षरावर. ही खास लताबाईंची गायकी!! शाब्दिक आशय सुरांतून किती प्रत्ययकारी पद्धतीने मांडता येतो, हे सुरेख उदाहरण. पुढील ओळ - तोसे दिल क्यो लागाया, जैसे रोग लगाया. इथे परत रचना मंद्र सप्तकात घेतली आहे आणि गमतीचा भाग म्हणजे, ओळ ज्या स्वरांवर संपते तो स्वर परत, "रसिक" शब्दाच्या सुराशी नेमका जोडला गेलेला आहे. तीन मिनिटांच्या गाण्यात, तुम्हाला कुठेही "ठेहराव" घ्यायला फारशी फुरसत मिळत नसते. 
पहिल्या अंतरा सुरु व्हायच्या आधीचा वाद्यमेळ खास लक्षवेधी आहे. सतारीचे स्वर मध्य लयीत सुरु आहेत पण पार्श्वभागी, सारंगीचे सूर मंद स्वरात त्या सांगीत वाक्यांशाला अप्रतिम स्वरिक आशय देत आहेत. संगीतकाराची व्यामिश्र कलाकुसर इथे ऐकायला मिळते. काही क्षणांचाच वाद्यमेळ आहे पण त्याने गाण्याची रचना किती भरीव केली आहे. नीट ऐकले तर कळेल, सतार आणि सारंगीच्या सुरांत, व्हायलीनचे सूर किती अप्रतिमरीत्या मिसळले आहेत आणि पहिला अंतरा सुरु व्हायची जणू पूर्वतयारी करीत आहेत. 
जब याद आये तिहारी, सूरत वो प्यारी प्यारी 
नेहा लगा के हारी, तडपू मैं गम की मारी. 
या ओळी सुरु व्हायचा आधी, सतारीचे सूर त्या ओळींची गत मांडून ठेवतात आणि त्याच सुरात, "जब याद आये तिहारी, सूरत वो प्यारी प्यारी" ही ओळ ऐकायला मिळते. गाण्यात, कुठली ओळ किती वेळा आळवायची, याचे देखील "गणित"असते आणि ते संगीतकाराने नेमकेपणाने ठरवायचे असते. हीच ओळ परत घेताना, सूर बदलतात आणि रचना परत तार सप्तकात जाणार, याचे सूचन करतात. "नेहा लगा के हारी, तडपू मैं गम की मारी." ही ओळ ऐकताना, आपल्याला एक बाब निश्चित समजते, ही ओळ परत "रसिक" शब्दाच्या ओळीशी नाते जोडणार. गाण्यचे शब्द देखील किती सुंदर आहेत - नेहा लगा के हारी, तडपू मै गम की मारी. सगळी तडफड, प्रसंगी वांझोटी वाटणारी हैराणी मनात साचली आहे पण, निरुपायाने सहन करण्यावाचून कुठलाच पर्याय शिल्लक नाही. इथे तार स्वरच ती भावना दर्शवू शकतात. गाण्यातील शब्दांचे महत्व जाणून, रचना तयार करणे किती अवघड असते, हेच दाखवण्याचा हा एक प्रयत्न. 
इथे आणखी एक बाब मांडण्यासारखी आहे. पडद्यावर हे गाणे नर्गिसवर चित्रित केले आहे. गाणे विरही आहे, यात वादच नाही पण ती वेदना दाखवताना, बरेचवेळा हिंदी चित्रपटात ओक्साबोक्शी रडणे, हातातील बांगड्या फोडणे आणि हात रक्ताळून घेणे इत्यादी बटबटीत अभिनय केला जातो पण नर्गिस पडद्यावर असले काहीही करत नाही. डोळ्यातील अश्रू बघताना, आपल्याला सगळी वेदना वाचता येते. 
दुसरा अंतरा यायच्या आधीचा वाद्यमेळ जवळपास तसाच ठेवलेला आहे. अर्थात याचा दोन्ही प्रकारे अर्थ लावता येतो. एकतर, आधीचा वाद्यमेळ तसाच ठेऊन, संगीतकाराने झालेला परिणाम अधिक गडद करण्याची संधी साधून घेतली. अर्थात टीकाच करायची झाली तर, इथे नवीन प्रकारे रचना करायची संधी गमावली!! अखेर संगीतकाराचा अधिकार शेवटचा आणि महत्वाचा, इतकेच आपण इथे बोलू शकतो.  
ढूढे ये पागल नैना, पाये ना एक पैल चैना 
डसती है उजली रैना, का से कहू मैं बैना. 
हा गाण्यातील शेवटचा चरण. "ढूढे ये पागल नैना, पाये ना एक पैल चैना' ही देखील आधीच्याच कडव्यातील पहिल्या ओळीची चालीची पुनरावृत्ती आहे. पण पुढे फार वेगळी गंमत आहे. डसती है उजली रैना - "रैना" शब्दानंतर लताबाईंनी आकारात्मक जो आलाप घेतला आहे, तो केवळ अवर्णनीय आहे लयीची गती बघा आणि त्या आलापीचे सौंदर्य अनुभवा. ओळी वरच्या सुरांत आहे आणि तोच स्वर कायम ठेऊन, आलाप थोडा दीर्घ घेतला आहे आणि घेताना तो आलाप किंचित कंपायमान केला आहे. केवळ अफाट गायकी. लिहायला फार सोपे आहे पण गळ्यावर ते मांडणे निरतिशय कठीण आहे.स्वर तसाच पुढे चालत आहे आणि " का से कहू मैं बैना" म्हणताना, पायरी पायरीने स्वर उतरता होतो. काही क्षणांचा(च) हा आविष्कार आहे. गाणे केवढ्या उंचीवर जाउन पोहोचते. ही शेवटची ओळ परत तशीच त्याच स्वरांवर येते, जिथे पहिल्यांदा "रसिक बलमा" घेतले होते. गाणे संपताना, पुन्हा "रसिक बलमा" याच शब्दांवर संपते पण संपताना देखील लताबाईंच्या गायकीची कमाल ऐकायला मिळते. "बलमा" झाल्यावर, तोच सूर किंचित आणखी वरच्या पातळीवर नेला आणि गाणे आलापास्थित अवस्थेत संपते. ऐकणारा दि:डमूढ होतो. 
संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांनी चित्रपटीय स्वररचनेचा नवीन घाट  शोधला,आपला वाद्यमेळ अधिकाधिक सर्वसमावेशक केला. ते करण्यासाठी त्यांनी प्रसंगी ४०, ५०  व्हायोलिन वादकांना आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आणि वाद्यमेळाची व्याप्ती आणि मर्यादा वाढवल्या. त्यादृष्टीने बघायला गेल्यास, त्यांची दृष्टी सतत जागतिक संगीताच्या पटलावर असायची आणि त्यातील अनेक सांगीतिक संदर्भ आपल्या स्वररचनेत समाविष्ट  करून, चित्रपट संगीताला रंगतदार केले. ही बाब निश्चितच स्पृहणीय होती.



पूछो ना कैसे मैने रैन बितायी


"आहे गुणगुण,
      आहे मिणमिण,
खंगतात रंग अस्ताचलांतू;
केवळ धुसर शु्य ादही
किटतात पर्णे,
      जिणे जीवघेणे,
जगती मुक्याे फांद्याफांद्यांतू,
काळोखी कवेंत हालतात म्ला."
आरती प्रभूंच्या या ओळींतू, मावी दु:खाचे अत्यंत गडद रंग अम्लापणे उमटतात. सगळीकडे केवळ काळोखी, राखाडी रंग पसरला असू, कुठेच आशेचा किरण दिसत ाही पण तरीही आपले आयुष्य आपल्याला अटळपणे भोगावे लागणारच असते. तिथे आपल्या हाती कुठलाच पर्याय शिल्लक सतो.  केवळ श्वास आहे म्हणू आयुष्य आहे.  
चित्रपट गीतांत अशाच प्रकारच्या भावेवर असंख्य गाणी िर्माण झाली आहेत. अर्थात, चित्रपट गीतांत, कविता म्हणू विचार करता, इतकी तरल भावा अपवाद परिस्थितीत वाचायला मिळते आणि याचे मुख्य कारण, चित्रपट गीत ही प्रामुख्याे सामा्य रसिकांसाठी लिहिलेले असते आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शब्दांा दृश्यरूप देणे, ही या माध्यमाची प्राथमिक गरज असते. मावी भावांच्या अति तरल छटा पडद्यावर तितक्याच समर्थपणे दाखवणे तसे फार अवघड असते. त्यामुळे, गीत लिहिताा, दृष्यभा ठेवणे आवश्यक असते.
"मेरी सुरत तेरी आंखे" या चित्रपटातील " पूछो ा कैसे मैने रै बितायी" या गाण्यात, मी वर मांडलेल्या आरतीप्रभूंच्या ओळींचे काहीसे अर्धुकलेले दर्श वाचायला मिळते. चित्रपटातील गाणे हे ेहमीच चटपटीत तरीही आशयपूर्ण असावे लागते. कवी शैलेंद्र यांी हे गाणे लिहिताा असा विचार केलेला आढळतो. खरतर शैलेंद्र यांच्या कविता बहुश: अत्यंत साध्या, सोप्या शब्दांत लिहिलेल्या असतात परंतु तशाच शब्दांतू अर्थवाही भावा मांडण्यात, हा कवी बरेचवेळा यशस्वी झालेला दिसतो.आता हे गाणे, केवळ काव्य म्हणू वाचायला घेतले तर,  
"पूछो ा कैसे मैने रै बितायी
इक पल जैसे, इक युग बिता 
युग बीते मोहे ींद ा आई!!"
या ओळींतूच आपल्याला, पडद्यावरील पात्राची भावस्थिती समजू घेता येते आणि हेच तर, चित्रपट गीतांत महत्वाचे असते. अत्यंत थोड्या शब्दात, प्रसंगाची जाण व्यक्त होणे महत्वाचे.या चित्रपटात, अशोक कुमारची भूमिका सर्वस्वी वेगळी आहे. प्रतिभाशाली गायक परंतु लहापणीच कुरूप चेहऱ्याचा म्हणू "टाकू" दिलेला. उपेक्षेचे जिणे जगावे लागल्याे, केवळ खंतावलेले म सू मात एकूणच प्रचंड ्यूगंड तयार झालेला. त्यामुळे प्रसिद्धीपेक्षा सिद्धीकडे अधिक लक्ष. आयुष्य अंधारी जगात काढण्याची मीषा आणि तसेच जगायला सुरवात केलेली. अर्थात, कधीतरी मात दाबू ठेवलेल्या इच्छा उफाळू वर येणे क्रमप्राप्तच आणि याच जाणीवेतू, त्या गायकाच्या मात ही "विराणी" तयार होते. आता सकाळ उजाडली आहे पण मातील अंध:कार तसाच साचलेला आहे. त्यातू उद्भवलेली िराशा, हाच या रचेचा पाया आहे. त्यामुळे गाण्याचे चित्रीकरण हे अंधारी जगात होणे साहजिक.सकाळची वेळ असू देखील, गाण्याची चाल काहीशी दुर्मुखलेली आहे, यामागचे हे महत्वाचे कारण.   
इथे आणखी एक विशेष सांगता येईल. चित्रपटाचा ायक - अशोक कुमार. अत्यंत देखणा,राजबिंडा आणि रुबाबदार अभिेता. अतिशय संवेदशील कलाकार म्हणूविख्यात. आता, या चित्रपटातील भूमिका बघितली  तर,संपूर्ण वेगळ्या ढंगाची आहे. विद्रूप चेहरा ज्मत:  लाभल्याे,प्रसिद्धीपासू सतत दूर राहण्याची असोशी. सतत अंधारात वावरण्याची  जडवू घेतली आहे. हे गाणे देखील, अशाच अंधाऱ्या वेळेस  सुरु होते. वास्तविक, गाणे गायकी वळणाचे आहे. बहुतेकवेळा, शास्त्रीय अंगाचे गाणे अभिित करायची वेळ आली म्हणजे अभिेता  आक्रस्ताळी अभियाकडे वळतात पण इथे आपण बघितले तर, आपल्याला दिसतो तो अशोक कुमार यांचा अतिशय संयत वेदेचा अविर्भाव. गाणे अवघड चालीचे आहे पण कुठेही अभिित करताा, अभिय गाण्याच्या चालीशी जराही विसंगत ठरणार ाही याची योग्य ती काळजी घेणारा. 
आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, संगीतकार सचि देव बर्म यांच्या कारकिर्दीतील काही खऱ्या अर्थी अजरामर रचा घेतल्या, तर त्यात या गाण्याचा अंतर्भाव अवश्य करावाच लागेल. "अहिर भैरव" रागाचे स्वर आधाराला घेतले आहेत. वास्तविक, अहिर भैरव हा सकाळचा राग माला जातो आणि सकाळचे राग, प्रामुख्याे आंदी, काहीसे अंतर्मुख अशा प्रकारचे असतात पण हीच तर भारतीय संगीताची खासियत आहे. एकाच रागातू अंत छटा िर्माण करण्याची असामा्य क्षमता रागसंगीतात ेहमीच दडलेली आढळते. 
कवितेतील करुण, आर्त भाव, संगीतकाराे तितक्याच समर्थपणे रचेतू प्रतीत केला आहे आणि गायक मा डे यांच्या गायकीतू तितक्याच अप्रतिमरीत्या ऐकायला मिळतो. सुरवातीचे सारंगीचे सूर आपल्या समोर गाण्याची पार्श्वभूमी तयार करतात. गाण्याचा "मुखडा" किती सुंदर आहे. सारंगीचे सूर काात तरळत असताा, आपल्याला मा डेच्या आवाजात आलापीचे सूर ऐकायला मिळतात मुळात, या गायकाचा आवाज म्हणजे ज्याला "अस्सल" गायकी म्हणता येईल असा आहे आणि इथे तर "गायकी" ढंगाची चाल मिळाल्यावर, त्याच आवाजातील घुमारेदार मार्दव अधिकच खुलू येते. या आलापीमधूच आपल्याला "अहिर भैरव" रागाची ओळख पटते.  
चित्रपट गीतांत, गायकी कशी दाखवता येते हे या गाण्यातू बघता येते."युग बीते मोहे ींद ा आई" ही ओळ गाताा, "बीते" या शब्दावर किंचित "कंप" घेतला आहे आणि तो देखील किती सूक्ष्म आहे!! ीट ऐकला तरच ध्याात येतो. इथे गाण्याच्या सगळ्या ओळी लक्षात घ्यायला घेणे जरुरीचे आहे. "युग बीते" मध्ये जी विषण्णतेची छटा आहे, त्याला असला "कंप" आवश्यकच आहे, जेणेकरू शब्दातील आशय अधिक भावगर्भ व्हावा. चित्रपट गीतांत गायकी ही अशाच अलंकाराे दिसते आणि सजलेली असते. पुढे "मोहे ींद ा आई" म्हणताा आवाज अधिक हळुवार आणि खालच्या पट्टीत आणला आहे आणि यामागे त्या शब्दातील औचित्य, सुरांच्या सहाय्याे खुलवले आहे, हाच विचार दिसतो. गाणे गाताा, गाण्यातील शब्द आणि त्यातील आशय समजू घेऊ, त्या शब्दांा, तशाच सुरांची जेंव्हा "अपरिहार्यता" मिळते, तिथे ते गाणे ेमक्या अर्थाे जमू जाते आणि ही अपरिहार्यता कशी तर तिथे दुसरा कुठलाच सूर प्रवेश करू शकत ाही. तिथे तोच सूर आणि त्याच "वजे" यायला हवा. 
पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा जो वाद्यमेळ आहे, त्यात सारंगीचे सूर प्रामुख्याे ऐकायला येतात आणि गाण्याच्या आधी जी सारंगीची सुरावट आहे, त्याचाच अधिक खोल विस्तार, या इथे ऐकायला मिळतो आणि याचा परिणाम, रचा अधिक बांधीव होते. गाण्याची चाल इतकी आर्त आहे की तिथे आणखी कुठल्याच वाद्याची गरज भासत ाही. मुळात, सारंगी हे वाद्यच पटक माची तार छेडणारे वाद्य आणि इथे तर फक्त त्याच वाद्याचा वावर!!  
"इक जले दीपक, इक म मेरा 
फिर भी ा जाये मेरा घर का अंधेरा 
तरपत, तरसत उमर गवायी 
पूछो ा कैसे मैने रै बितायी"
या ओळी गाताा, गायकाे एके ठिकाणी अतिशय सुंदर हरकत घेतली आहे."इक जले दीपक, इक म मेरा" ही ओळ वारंवार घेतली आहे पण प्रत्येक वेळेस सुरांचे वळण वेगळे आहे, प्रत्ययकारी आहे. "मेरा" शब्द घेताा, इथे स्वर तर थोडा उंचावला आहेच पण तो इतका देखील वरच्या सुरांत ाही की तिथे "गायकी" प्रस्थापित होईल. शब्दांतील हताषता सुरांतू कशी मांडायची, याचा हा सुंदर वस्तुपाठ आहे. कुठेही विशविशीतपणा ाही तर प्रत्येक सूर हा, प्रत्येकवेळी रचेच्या पहिल्या सुराशी ाते जडवू घेतो. असे असू देखील, रचा म्हणजे रागाचे "लक्षण गीत" ाही, हे देखील समजू घेता येते. "उमर गवायी" म्हणताा ज्या सुरांत गायले गेले आहे ते ऐकताा, मला ेमके काय म्हणायचे आहे, याचा अंदाज घेता येईल. अर्थात, इथे संगीतकार सचि देव बर्म यांचे श्रेय देखील तितकेच महत्वाचे. ही "शब्दप्रधा गायकी" आहे पण "कविता वाचव्हे!!
"फिर भी ा जाये मेरा घर का अंधेरा" ही ओळ म्हणताा, सुरवात मंद्र सप्तकातील सुरांत होते पण लगेच "मेरा घर का अंधेरा" हे शब्द घेताा सूर किंचित उंचावला गेला आहे, विशेषत: "का" अक्षर घेताा स्वरांतू जी व्याकुळता प्रदर्शित होते, ती खास गायकाच्या गायाची खूण!! "अंधेरा" अधिक गडद होतो. मजेचा भाग असा आहे, हा अंतरा वेगळ्या सुरांवर सुरु होतो आणि तिथे मूळ रागाच्या सुरांपासू फारकत आहे पण, अंतरा संपत असताा, आपण परत मुखड्याच्या सुरांपाशी येउ थांबतो. हे सगळे केवळ अिर्वचीय आहे. 
संगीतकार सचि देव बर्म यांी, रचा बांधताा सरळसोट "केरवा" ताल वापरला आहे पण तोच ताल संपूर्ण रचेत तसाच कायम ठेवला आहे. किंबहुा अतिशय धीम्या लयीत तालाचे बोल चालत आहेत. धीम्या वजाचा केरवा ताल रचेत फिरत आहे. 
दुसरा अंतरा सुरु होण्याआधी, परत सारंगीची तशीच "गत" कायम ठेवली आहे आणि त्याच सुरांवर दुसरा अंतरा सुरु होतो. 
"ा कही चंदा, ा कही तारे 
ज्योत के प्यासे मेरे  बेचारे 
भोर भी आस कि किर ा लायी 
पूछो ा कैसे मैने रै बितायी"
हा अंतरा पहिल्या अंतऱ्याशी ाते राखू गायला गेला आहे. किंबहुा, स्वरांतील छोटे,छोटे खटके देखील त्याचप्रमाणात घेतले आहे. खरतर बरेच संगीतकार इथे प्रयोगशीलता दाखवतात पण इथे संगीतकाराे, स्वरांचा तोच "आराखडा" कायम ठेवू, आधी जो परिणाम साधलेला आहे, तोच परिणाम अधिक गडद, खोलवर केलेला आहे.वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, संगीतकाराला, आपण जी तर्ज िर्माण केली आहे, त्याच्यावर प्रचंड आत्मविश्वास असल्याचे द्योतक आहे आणि जर का आपण, हाच दृष्टीको लक्षात घेतला तर तो विश्वास अाठायी ाही, याचाच प्रत्यय स्वररचनेतून आणि गायनातून घेता येतो."ा कही चंदा, ा कही तारे, ज्योत के प्यासे मेरे  बेचारे" या शब्दातून जी व्याकुळता वाचायला मिळते, खरेतर त्याहून अधिक आर्त, खोलवर विराणीची भावना मन्नाडेंच्या सुरांतून मिळते. ललित  संगीताच्या आविष्कारात सूर कसे मनाचा ठाव घेतात आणि आत रक्तात मिसळून जातात, याचा आदिनमुना या गाण्यातून आपल्याला बघायला/ऐकायला मिळतो. मन्नाडे यांनी आपल्या गायनाचे उत्तुंग शिखर या सादरीकरणातून गाठले आहे, असे म्हटले तर निश्चितच अवाजवी ठरू नये.
कवी शैलेंद्रे लिहिताा, "भोर भी आस कि किर ा लायी" या शब्दात जी िराशता मांडली आहे, त्याचेच फलस्वरूप स्वरांतू ऐकायला मिळते आणि मग त्या गाण्याला चिरंजीवित्व मिळते, यात वल ते कसले!!   

निगाहे मिलाने को जी चाहता है

सुगम संगीतात, प्रत्येक आविष्काराचा एक स्वतंत्र ढाचा असतो. त्याची स्वतंत्र  संस्कृती असते आणि त्याला अनुरूप शब्दकळा, स्वरिक रचना आणि गायन, हे सगळे घटक त्या आविष्कारात एकवटतात. त्याचा स्वत:चा असा "लहेजा" असतो आणि खुमारी असते. गझलेची शायरी भावगीतापेक्षा वेगळी तर कव्वालीचा रचना ढंग वेगळा. प्रत्येक गीताच्या शब्दकळेनुरूप सादरीकरण आणि सांगीतिक वाक्यांशाचा बदल आणि गायनाची पद्धत बदलत असते. खरतर कुळशील भिन्न असते. 
गझल म्हणजे भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार तर कव्वाली हा सुफी पंथातून निघालेला अधिक ललित भाग. तसे बघितले तर या रचनेत रागदारी संगीताचा प्रभाव तर नक्कीच असतो पण रागाचे मूळ स्वरूप बाजूला ठेऊन, त्यातील लालित्याचा भाग अंगिकारला जातो. अर्थात, शायरीची रचना देखील वेगळी असणे क्रमप्राप्तच असते. कव्वालीमध्ये  शृंगारिक, भक्तीभाव तसेच सवाल-जवाब पद्धतीने शायरीचे घाट बदलत असतात आणि त्यानुसार चालीची रचना तयार होत असते. 
"निगाहे मिलाने को जी चाहता है" ही कव्वाली, हिंदी  गीतांतील एक अजरामर रचना म्हणून मान्यता पावली आहे. संगीतकार रोशन, यांनी या रचनेची चाल  बांधली आहे. रोशन यांच्या कारकिर्दीकडे जरा बारकाईने बघितले तर, त्यांच्यावर उर्दू संस्कृतीचा प्रभाव आणि ठसा पडलेला आढळतो. उर्दू संस्कृतीत आढळणारे आलिशान वर्णन तसेच शृंगार आणि विलासी जीवनाचे प्रतिबिंब, शायरीमध्ये नेमकेपणी दिसते आणि त्याचाच अतिशय रम्य आविष्कार संगीतासारख्या तरल कलेतून वारंवार आढळतो. "दिल ही तो है", या चित्रपटातील ही कव्वाली, प्रसिद्ध कवी साहिर लुधीयान्वी यांनी लिहिली आहे. पारंपारिक रचनेत, आपल्याला नेहमीच सवाल-जवाब वाचायला मिळतात आणि त्या निमित्ताने भाषेतील खटकेबाज आणि रंगतदार शब्दकळा अनुभवायला मिळते. 
गंमत असते ती सगळी रचना कौशल्यात. एकतर अशा प्रकारच्या रचना, त्याचा अंगभूत स्वभावामुळे काहीशा दीर्घ स्वरूपाच्या असतात, जेणेकरून शायरीमध्ये भाषिक फुलोरा फुलून यावा. 
"राज की बात है महफ़िल में कहे या ना कहे,
बस गया है कोई इस दिल मे कहे या ना कहे.

निगाहे मिलाने को जी चाहता है
दिल-ओ-जान लुटाने को जी चाहता है."

चित्रपटात, ही रचना प्रामुख्याने नूतन या अभिनेत्रीवर चित्रित झाली आहे. वास्तविक, ही अभिनेत्री गंभीर भूमिकांसाठी प्रसिद्ध होती.पण, या गाण्यावरील तिचा अभिनय केवळ अप्रतिम. कवितेत मांडलेला आशय, तिच्या चेहऱ्यावर इतका समर्थपणे उमटलेला दिसतो की त्यामुळे, एकूणच रचनेची खुमारी अधिक वाढते. विशेषत:, "निगाहे मिलाने को जी चाहता है" या ओळीवरील तिच्या चेहऱ्यावरील खोडकर छटा खास अनुभवण्यासारखी आहे. एकतर तिला संगीताची उपजत जाण असल्याचे समजते. ही वरील ओळ जेंव्हा आशाताईंच्या गळ्यातून बाहेर येते, तेंव्हा Camera तिच्या चेहऱ्यावरील भाव अगदी नेमकेपणाने टिपतो आणि गाण्याची गोडी अधिक वाढते.  
गाण्याची सुरवात,  पारंपारिक कव्वाली थाटाने झाली आहे, म्हणजे ढोलक,हार्मोनियम आणि टाळ्या यांचा समन्वय साधून, गाण्याची पार्श्वभूमी तयार केली आहे. अर्थात,  हळूहळू द्रुत गतीत नेउन, एका विविक्षित क्षणी थांबवली आहे आणि तिथे आपल्याला आशा भोसलेंच्या आवाजात छोटीशी आलापी आणि मुखडा समोर येतो. खरतर इथेच यमन राग आपल्याला कळून घेता येतो. सुरवातीच्या द्रुत लयीतून, रचनेची सुरवात काहीशी संथ लयीत होते आणि चाल मनाची पक्कड घेते. इथे आणखी एक वैशिष्ट्य सांगावे लागेल. शायरी उर्दू आहे आणि त्या भाषेचा लहेजा, आशा भोसले यांनी आपल्या स्वरांतून अतिशय नेमकेपणी दाखवला आहे. 
"वो तोहमत जिसे इश्क कहती है दुनिया,
वो तोहमत उठाने को जी चाहता है."
इथे "इश्क" आणि "तोहमत" हे खास उर्दू शब्द आहेत आणि ते या ओळीतील आशयाचा अर्क आहेत. गायिकेने, याचे ने महत्व जाणून, आपल्या स्वरिक आविष्काराने कसे मांडले आहेत, हे ऐकण्यासारखे आहे. प्रत्येक भाषेची जी खासियत असते, ती त्यातील शब्दांच्या उच्चारात आणि ते उच्चार, जसेच्या तसे स्वरांतून काढणे, ही बाब वाटते तितकी सहजगत्या जमणारी कधीच नसते. कवी म्हणून साहिर आणि गायिका म्हणून आशा भोसले, यांचे श्रेष्ठत्व अशाच छोट्या पण अति महत्वाच्या जागेतून दिसून येते. गाण्याची लय किंचित जलद झाली आहे, तालाचा वेग देखील वाढला आहे आणि अशा वेळेस, शब्दाचे वजन अचूक  दाखवणे,सुगम संगीतात नेहमीच अत्यावश्यक असते. 
"किसी के मनाने में लज्जत वो पायी, 
के फिर रूठ जाने को जी चाहता है." 
मघाशी मी नूतनच्या अभिनयाचे वर्णन करताना, चेहऱ्यावरील खोडकर भावाबद्दल लिहिले होते. इथे शब्दकळा बदलेली आणि "लज्जत" तसेच "रूठ" या शब्दातून प्रणयातील मुग्ध भाव समोर आला. नूतन, हेच भाव आपल्या चेहऱ्यावर किती अप्रतिम दाखवते. हा वाचिक अभिनय, गाण्याची "लज्जत" आणखी वाढवतो. 
गाण्याची चाल गायकी ढंगाची आहे आणि गाण्यात विस्ताराच्या अनेक शक्यता दिसतात. याचाच परिणाम असा, 
"वो जलवा जो ओझल भी है सामने भी,
वो जलवा चुराने को जी चाहता है". 
यातील पहिली ओळ गाताना, ती गायकी अंगाने घेतली आहे परंतु गायकी अंग म्हणजे रागाचे प्रदर्शन नव्हे. लयीच्या ओघात, तीच ओळ वेगवेगळ्या "अंगाने" आळवून, परत परत घोळवली आहे. इथे गाण्याची लय अधिक द्रुत होते आणि हे पारंपारिक कव्वाली रचनेचे वैशिष्ट्य म्हणता येईल. सुरवातीची संथ लय आणि आताची द्रुत लय, परत ऐकली म्हणजे यातील सांगीतिक वाक्यांशाचा आनंद घेता येईल.
यापुढील रचना, गाण्याच्या दृष्टीने थोडी दीर्घ आहे. 
"जिस घडी मेरी निगाहो को तेरी दीद हुई  
वो घडी मेरे लिये ऐश की तमहीद  हुई  
जब कभी मैने तेरा चांद सा चेहरा देखा  
ईद हो या के नी हो, मेरे लिये ईद हुयी
वो जलवा जो ओझल भी है सामने भी 
वो जलवा चुराने को जी चाहता है" 
या ओळी वाचताना, आपल्याला सहज समजून घेत येईल, या ओळीतून, नायिकेचा आपल्या सखींशी संवाद चालला आहे. आपला नायक डोळ्यासमोर आहे पण वेगळ्या रुपात आलेला आहे. "वो घडी मेरे लिये ऐश की तमहीद  हुई, ईद हो या के नी हो, मेरे लिये ईद हुयी" इथे मुस्लिम संस्कृतीतील "ईद" आणि "चांद" याचा गोड संबंध ध्यानात घेतला म्हणजे शब्दातील खुमारी ध्यानात येईल. कव्वाली रचनेत हीच तर खरी गंमत असते. शाब्दिक फुलोरा आणि उपमांचे संयोजन जागोजागी वाचायला मिळते. या ओळींमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला हरकती ऐकायला मिळतात पण त्या हरकतींतून गाण्याचा गोडवा अधिक वाढतो आणि संगीतकार म्हणून रोशन यांचे हे खास कर्तृत्व म्हणावे लागेल. 
हा अंतरा झाला की आपल्याला अप्रतिम सरगम ऐकायला मिळते. "नि रे ग ग रे ग नि म" अशी ती सरगम आहे. हा तर यमन रागाचा वाक्यांश. इथे आशा भोसले "खालच्या रे पासून वरचा रे" किती अचूक घेतात, ही मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. लयीची गती घेऊन, तालाची गती सांभाळून, ही सरगम (हरकतींच्या फिरतीसह) कव्वालीला वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवते. 
"मुलाकात का कोई पैगाम दीजे 
के छुप छुप के आने को जी चाहता है 
और आ के ना जाने को जी चाहता है" 
रचना आता अति जलद लयीत शिरलेली आहे पण तरीही गाताना शब्दांचे औचित्य कुठेही डागाळलेले नाही, ही फार महत्वाचे आहे. 
"आ के ना जाने को जी चाहता है" ही ओळ शेवटची आहे, तेंव्हा रचना समाप्त होणार हे ध्यानात घेऊन, इथे द्रुत लय, कशी परत एकदा संथ लयीत आणली आहे, हा भाग फार वेधक आहे. परत पहिल्या ओळींवर गायन येते आणि ही रचना संपते, जिथे ही रचना सुरु झाली होती. रोशन यांचा रागदारी संगीताचा किती व्यापक अभ्यास होता, हे दर्शविणारी ही रचना आहे. ही रचना ऐकताना, वारंवार एक जाणीव होते. हे गाणे "ठुमरी" स्वरूपात जाऊ शकले असते पण, शब्दरचना कव्वाली थाटाची आहे आणि समजून रचनेला तसे नेमके वळण, रोशन यांनी लावले आणि हिंदी चित्रपट गीतांतील एका अजरामर गाण्याचा जन्म झाला. 
 

Wednesday, 4 December 2019

लक्ष्मीकांत - प्यारेलाल

ही जोडी हिंदी चित्रपट संगीतात प्रसिद्ध होण्यापूर्वी, या क्षेत्रात काही संगीतकार जोड्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता, प्रसंगी सर्जनशीलतेचे नवीन पायंडे पाडले होते. किंबहुना ही जोडी प्रकाशात येण्याआधी  शंकर-जयकिशन किंवा कल्याणजी-आनंदजी या जोडींनी आपली कारकीर्द गाजवायला सुरवात केली होती. लक्ष्मीकांत  पहिल्यापासून मेंडोलिन वाड्यावर प्रभुत्व मिळवून होते तर प्यारेलाल यांनी ट्रम्पेट (प्यारेलाल यांचे वडील रामप्रसाद देखील उत्कृष्ट वादक होते, हा योगायोग) वाड्याचा पायाभूत अभ्यास केला होता तसेच अशी माहिती मिळते, प्यारेलाल यांनी गव्याच्या अँथनी गोन्साल्वीस या संगीतकाराकडे काही काळ प्राथमिक धडे घेतले होते. कारकिर्दीच्या सुरवातीला त्यांनी कल्याणजी-आनंदजी  यांच्याकडे काही काळ शागिर्दी पत्करली होती. १९६३-६४ मध्ये त्यांचा "पारसमणी" हा चित्रपट आला आणि हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात आपल्या नावाची ग्वाही पसरवली. पुढे १९६४ मध्ये "दोस्ती" चित्रपटाची गाणी अफाट गाजली आणि त्यांचे स्थान प्रस्थापित झाले असे म्हणता येईल. सुमारे ३५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ४०० चित्रपटांना संगीत दिले. याचा परिणाम, शंकर-जयकिशन यांच्यानंतर सिनेमाप्रेक्षक खेचणारी हीच रचनाकार जोडी ठरते. 
साधी, गुणगुणण्यासारखी गाणी  
संगीत रचनाकार म्हटलं की त्याचा एक पायाभूत गुण असतो आणि तो म्हणजे गुणगुणण्यासारखी चाल बांधता येणे. आणि हाच जर एक निकष मानला तर या जोडीने अशा गीतांच्या वर्गात मोडतील अशा भरपूर रचना केल्या. किंबहुना कारकिर्दीच्या पहिल्या पाऊलखुणा अशाच प्रकारच्या गाण्यांनी उमटवल्या. "हंसता हुवा नूरानी चेहरा" (पारसमणी - आशा भोसले/कमल बारोट) हे युगुलगीत प्रचंड गाजले. दोन आवाजांनी गायलेले हे द्रुतगती, तजेलदार, सौंदर्यसुक्त भैरवी या न संपणाऱ्या माधुर्यपूर्ण रागिणीच्या साव आणि चलनात लीतील गीत. थोडे विश्लेषणात्मक लिहायचे झाल्यास, पंचम स्वरावर पहिले दोन चरण केंद्रित होतात. पुढील ओळ एक सूर खाली उतरते आणि मग "दिलरुबा" शब्द द्विरुक्त होतो - परिणाम ऐकणाऱ्याच्या मनावर रेंगाळतो. परिचित रागचौकटीचा वापर आणि सहज ध्यानात राहील असा मुखडा या विशेषांचा आढळ "जीवन डोर तुम्हे संग बांधी" (लताबाई - सती सावित्री) यासारख्या गीतातही होतो. या गीताचा आरंभ यमन राग पायाभूत मानून होतो आणि पहिली ओळ "सा" या आधारस्वरावर थांबून गीताच्या आशयाशी शांत आणि ठामपणा प्रदान करते. "ज्योत से ज्योत जगाते चलो" (मुकेश - संत ज्ञानेश्वर) हे गीत भैरवीचा आधार घेऊन निघते आणि आपल्या भजनसमान साध्या बांधणीत श्रोत्यांना नकळत गुंगवून टाकते. 
श्रोत्यांच्या मनात-कानात गीत रुजवण्यासाठी वापरायचे या जोडीचे आणखी खास वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गीताचा पहिला चरण सप्तक मर्यादेतील मधल्या स्वरावर म्हणजे पंचमावर आणि दुसरी ओळ खाली आणून आधारस्वरावर म्हणजे षड्ज स्वरावर ठेवणे. अनेक वेगवेगळ्या कारणांनी सुरावट "सा" स्वरावर संपली म्हणजे एक प्रकारची पूर्णतेची आणि स्थैर्याची भावना मनात दृढ होते. 
"डफलीवाले" हे असेच प्रचंड गाजलेले गीत (लताबाई/रफी - सरगम) खूपच मोहवणारे युगुलगीत  आहे. मधुर चाल, उस्फुर्त आणि ऊर्जापूर्ण फेक, प्रवाही सुरावट आणि डफली या न-स्वरी लोक लयवाद्याचा आकर्षक आणि पुनरावृत्त वापर ही खास वैशिष्ट्ये होत. 
सांगीत जमवून घेणे आणि प्रयोगशीलता 
या संगीतकाराबाबत एक गोष्ट लक्षात येते, त्यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटाची शीर्षकगीते आकर्षक असून, त्या चित्रपटाचे नाव गाण्यात गुंफण्याची तरकिब छान करतात. वास्तविक पहाता हा मुद्दा संगीतबाह्य आहे परंतु संगीतबाह्य परिस्थीतीशी जमवून घेऊनही सांगीत पथ्ये पाळत होते, हे नि:संशयरीत्या मान्य करायला हवे. 
या मुद्द्यासाठी आपण एक उत्तम उदाहरण बघूया. "उत्सव" ( १९८४) या रुढीबाहेर पडणाऱ्या चित्रपटाचे त्यांचे संगीत एक भरीव उदाहरण ठरते. चित्रपटीय सौंदर्यशास्त्रानुसार जी अधिकार परंपरा अपरिहार्य असते तिची हुकूमत मान्य करून या रचनाकारांनी आपल्या कामगिरीवर स्वतःच मर्यादा घालण्याचा विरळा सुज्ञपणा दाखवला. प्रस्तुत संगीताचे थोडे विश्लेषण केल्यास काही बाबी समोर येतात. 
या चित्रपटातील एक रचना, "सांज ढले गगन तले" गीत असे होते. "मन क्यों बहेका रे" हे देखील या दिशेने जाऊ न शकणारी रचना आहे. सादरीकरणातले खंडितपण, चालींचे व सुरावटीचे धागेदोरे पक्केपणाने आपल्या दर्शित शेवटाकडे न जाणे अशा कारणांनी गीत होऊ शकत नाही. दुसरा बारकावा असा, या चित्रपटाच्या संपूर्ण संगीतलेखात हिंदुस्थानी कला संगीतात मारवा आणि बिभास या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या रागांच्या अवतीभवती फिरत राहणारे स्वर योजण्याची हेतू जाणवतो. या दोन्ही रागांच्या चौकटीचे वा बांधणीचे स्वरूप असे आहे, की त्यामुळे "सा" या आधारस्वराचे महत्व या ना त्या प्रकारे कमी होते.  परिणामतः सुरावटींच्या चलनातून उत्पन्न होणाऱ्या तणावांचे विसर्जन होत नाही. चित्रपटाचा आशय ध्यानात घेता जे प्रेम शिष्टसंमत मानले जात नाही, त्याचे चित्रण चित्रपटात आहे. तेंव्हा, सांगीत ताण विसर्जित  न होणे हा चित्रपटीय लाभ नव्हे का!
त्यांच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत, "उत्सव" मध्ये हे रचनाकार वाद्यवृंदाचा उपयोग जरा हात राखून करतात. एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी, १९६० च्या दशकापासून हळूहळू अधिक आक्रमकता, हिंसा यांनी भरलेल्या चित्रपटांची सद्दी आली. या कालखंडात संगीताची जागा हिंसेने घ्यायला सुरवात झाली. त्यादृष्टीने या ना त्या मार्गाने, ही जोडी दैनंदिन जीवनाच्या वा वास्तवाच्या आकृतिबंधाच्या जवळ संगीत नेण्याचा प्रयत्न करीत होती. "बॉबी" चित्रपटाचे संगीत अशी नवी परिमाणे दाखवतात.  
प्रचलित प्रवृत्ती आणि त्यांना साजेसे संगीत देण्याची त्यांची विनातक्रार तयारी यांची प्रतीती "मस्त बहारों का (रफी - फर्ज) किंवा "दुनिया पागल है" (रफी - शागीर्द) यांसारख्या गीतांतून येते. ही दोन्ही गीते "याहू" शैलीतील आहेत. या गाण्याचे जरा बारकाईने निरीक्षण केले तर असे आढ ळते, संगीतबाह्य आवाजाने ही गाणी सजवली आहेत आणि तसे करण्याने कुठेही गीततत्व ढळत नाही. वाद्यघोषातील वाद्ये ऐकणाऱ्यांच्या कानावर हल्ला करण्याचे कर्तव्य पार पाडतात! 
१९७० पासून आणि पुढे ही चर्चित रचनाकार जोडी प्रयोगशीलतेबाबत परंपरेत राहून किंवा तिच्या बाहेर पडूनही नव्या रचना करण्यात उत्साही होती. उदाहरणार्थ "सून जा आ ठंडी हवा" (किशोर/लताबाई - हाथी मेरे साथी) या गीतातील चरण आणि सुरावटीची ओळ यांच्या दरम्यान अधिक खेळ करण्याकडे कल होता. या रचनेत सुरावटीची ओळ छंदातल्या २ ओळी व्यापते. त्यामुळे सांगीत विधान अर्थातच अधिक अखंड आहे. दुसरे उदाहरण - "तेरे मेरे बीच में" (लताबाई/बालसुब्रमण्यम - एक दुजे के लिये) या रचनेत महत्वाकांक्षी, द्रुत आणि गुंतागुंतीचे वाक्यांश शब्दांच्या शेवटी गायकांसाठी आणि तितकीच कसोटी पाहणारी सुरावट तारस्वरीं बासरीवर योजली आहे. अर्थात इथे मुद्दा येतो, अशा प्रकारचा उच्च रव करणे, ही या जोडीची युक्ती होती का? कारण इतर रचनांत देखील हीच युक्ती अवलंबली असल्याचे दिसते. "ये वक्त ना खो जाये" (लताबाई/बालसुब्रमण्यम - ये रास्ते प्यार के) या रचनेत अशीच युक्ती वापरल्याचे ध्यानात येते. हे अनन्यसाधारण आहे, असे इथे नकीच सुचवायचे नाही पण अशा युक्त्या वापरून गाणे प्रसिद्ध करायचे, या कलेत ही जोडी वाकबगार झाली होती, हे नि:संशय. 
शैलींना एकत्र आणणे 
रूढ संगीतप्रकारांचे किंवा शैलीचे मिश्रण करणे, या संगीतकारांना पसंत होते. "कोई शहरी बाबू" (आशाबाई - लोफर) या गाण्यात खेड्यातील बँडवादनातील स्वरवाक्ये, भांगडा नृत्यगीत आणि पारंपरिक स्त्री गीत एकत्र केले आहे. याच प्रकारच्या परंतु फसलेल्या रचनेचे उदाहरण - "चल ओ माझी" (रफी - आय सावन झुमके) हे गाणे. हिंदी चित्रपटसंगीतात नाविकांचे गाणे (आदर्श नमुना - बंगाली भटियाली) हा लोकमान्य आणि रूढ गीतप्रकार आहे. मात्र प्रस्तुत रचना निव्वळ उपदेशपर गीताचे कार्य पार करण्यासाठी तद्दन शहरी, फिकट सांगीतिक रूप आहे. "दुनिया में मेला, मेलेंमे लडकी" (लताबाई - राजा जानी) ही रचना मात्र संस्कारित स्त्री गीत म्हणून पुढे येते. एकंदरीत भट्टी जमते. परंतु "तुने मुझे बुलाया" या गाण्यात भक्तिसंगीत आणि पंजाबी भांगडा मिसळण्याचा प्रयत्न तद्दन फिल्मी किंवा स्पष्टपणे फसतो. त्यामानाने "एक ऋतू आये" (किशोर कुमार - गौतम गोविंदा) हे गीत ऐकणे वेधक वाटते. 
विनोदी गीतांच्या बाबतीत हे रचनाकार फसले आहेत, असेच वाटते. "मेहेबुबा मेहेबुबा" (साधू और शैतान) या गीतातले विनोदी भाव म्हणजे शैलीबद्ध समूहगीत, भपकेदार पोशाख आणि शब्दांकडे तिरकस पाहणे, इतकेच घडते. विनोद कवितेतच शोधावा लागतो. 
शास्रोक्त पासून दूर सरकणे 
चित्रपटसृष्टीतील अनेक व्यावसायिक रचनाकारांप्रमाणे ही जोडी देखील भारतीय कलासंगीतातील राग, ताल आणि रूढ प्रकारांपासून दूर सरकण्याची कौशल्य दाखवणे तसेच दूर सरकणे कुणालाही जमू शकते. मुद्दा असा आहे, असे दूर सरकण्यातून गुणवत्तापूर्ण म्हणण्यासारखे यात काय काय साधले, याचे मूल्यमापन करणे होय. सुदैवाने या जोडगोळीला हे जमले आहे. "उत्सव" चित्रपटाबाबत आपण आधीच चार शब्द लिहिले आहेत. "मेरे सांसो को महेक आ रही है" (माताबाई/महेंद्र कपूर - बदलते रिश्ते) हे गीत ऐकण्यासारखे आहे. पुरिया धनाश्री या रंगाच्या काहीशा अंगभूत संदिग्धतेच्या वर्तुळात रचना वावरते. कलासंगीताचे साचे वापरले नाहीत, वाद्यवृंद काटकसरीने वापरला आहे. पूर्ण प्रयत्नांती कुठलीही गुणगुणण्यासारखी चलने मागे रेंगाळत नाहीत परंतु त्यापलीकडे काहीतरी सुचवू पाहणारी एक सांगीतिक गुंतागुंत अस्वस्थ करून जाते. हे या रचनाकाराचे यश नव्हे का? 
आणखी एक, दोन उदाहरणे देता येतील. "सुनो सजना" (लताबाई - आये दिन बहार के)  तसेच "तुम गगन के चंद्रमा" (लताबाई/मन्ना डे - सती सावित्री) ही दोन्ही गाणी चित्रपटसंगीतात वारंवार वापरलेल्या यमन रागाच्या आसपास वावरतात परंतु कुठेही राग सादर केल्याचा आव आणला जात नसून एक सुंदर चित्रपटगीत सादर होत आहे,असेच जाणवते. 
भाषण-संगीत पट 
"अच्छा तो हम चलतें हैं" (लताबाई/किशोर -आन मिलो सजना) ही रचना ऐकताना एक लक्षात येते, ही रचना पूर्णतः गीत नसल्याने आपल्यात आकर्षण निर्माण झाले आहे. भाषण-लयी आणि भाषण - खंड यांची पेरणी करीत हुशारीने गीतात्मतेचे सूचना करणारी रचना आहे. एक सांगीत आनंद आकाराला येतो आणि संयमित, प्रामाणिक आणि गुदगुल्या करणारी छेडछाड व्यक्त होते. 
आता असे म्हणता येईल, गीतामध्ये भाषण-गीत संकर म्हणजे सांगीत गुणवत्ता नव्हे, असे नाही. इच्छित सांगीत आवाहकता निराळ्या प्रकारची असते. आणखी प्रसिद्ध उदाहरण द्यायचे झाल्यास, "पवन करे शोर" (लताबाई/मुकेश - मिलन) या रचनेचे वेधकपण त्यातील बोलल्या जाणाऱ्या भागात का? हे निश्चितच तपासावे लागेल. आणि याच विचाराने पुढे विधान करायचे झाल्यास, "बॉबी" चित्रपटातील गाणी हा योगायोग नव्हे. 
निष्कर्ष असा, या जोडगोळीने आपल्या आरंभीच्या टप्प्यावर गीत दाबून अथवा दडवून न टाकणारा पण कां भरणारा वाद्यरंग वापरण्याचे धोरण पुढे चालवले. "जंगली" या चित्रपटाने दर्शित टप्प्याला ते यशस्वीपणे सामोरे गेले आणि सपाट, अनलंकृत थेटपणे गाण्याच्या शैलीही पचवल्या. एकूण दृष्टिकोन, दैनंदिन आकृतिबंधाशी जवळीक साधण्याचा, आधुनिक शहरी तरुणांच्या मनात शिरण्याचा, त्याकाळच्या चित्रपटात विधिकृत्यातील सामूहिकता आणि म्युझिक-व्हिडियो युगातल्या शृंगारिक, अनेक केन्द्रियसंवेदना यांना आवाहन करणारे संगीत येऊ घातले होते. 

Thursday, 21 November 2019

नौशाद

भारतातील काही शहरांना सांस्कृतिक संपन्नतेचा वारसा लाभलेला आहे आणि त्यातील एक शहर - लखनौ. प्रसिद्ध संगीतकार नौशाद हे याच शहरात जन्माला आले.  त्यामुळेच बहुदा असेल, परंतु उत्तर प्रदेशाची सांगीत संपत्ती, लखनौचे दरबारी वळण आणि प्रयोगकलात्म संचित यांची भारताला नव्याने ओळख घालून द्यायचा घाट घालणे, हे एक प्रकारे अपरिहार्यच होते, असे म्हणता येईल. हिंदी चित्रपटीय संगीताच्या विविध विकासावस्थांवर आपुलकीने प्रकाश टाकणे, हे त्यांनी आपले मूल तत्व मानले, असे सहज म्हणता येईल. हिंदी चित्रपट संगीत ही भारतभर आपला खोलवर प्रभाव उमटवणारी एक सांस्कृतिक-सामाजिक घटना आहे आणि तिच्या सगळ्या विकासावस्थेत नौशाद सहभागी होते, याची आपण निश्चितच जाण ठेवायला हवी. 
"प्रेमनगर" (१९४०-४१) या चित्रपटासाठी नौशाद यांना ३०० रु. (प्रचंड!!) रक्कम मिळाली होती. खरतर इतक्या कमी पैशात काम करून देणारा संगीतकार, याच भांडवलावर त्यांना संधी मिळाली होती. पुढे याच नौशाद यांनी "बैजू बावरा" (१९५२) या चित्रपटासाठी घसघशीत ५०,००० रु. मानधन घेतले होते आणि १९५५ च्या सुमारास प्रत्येक चित्रपटामागे एक लाख मागायला सुरवात केली!! एकंदरीत ५८ चित्रपटांना त्यांनी संगीत दिले - त्यातल्या २६ चित्रपटांनी रौप्य महोत्सव तर ८ चित्रपटांनी सुवर्ण महोत्सव साजरे केले. आजच्या काळात हि सांख्यिकी माहिती आश्चर्यकारक वाटणार नाही परंतु थोडा विचार केला तर आरंभीच्या काळातील चित्रपट निर्मितीचा वेग, गीतांचे ध्वनिमुद्रण यांत्रिक झपाट्याने होत नसे. त्या शिवाय नौशाद जरा चोखंदळपणे काम करत. होकार देणे, संगीत रचणे, तालमी घेणे आणि ध्वनिमुद्रण करणे, या सगळ्या प्रक्रियेत ते आपल्या(च) गतीने जात असत. आपण शीघ्रगती संगीतकार नाही, असे जाहीरपणे मान्य करण्यात त्यांनी हात आखडता घेतला नाही. 
सुरवातीच्या लहानपणीच्या काळात त्यांनी भरपूर चित्रपट बघितले, पुढे संगीत वाद्ये विकण्याच्या दुकानात नोकरी केली. जणू काही आपल्या जीवनकार्याचा पूर्वतयारी म्हणून एक हार्मोनियम मिळवला आणि मुकचित्रपटास जिवंत संगीत पुरवण्याचे काम देखील स्वीकारले. नंतर त्यांनी पियानो वाद्यावर प्रभुत्व मिळवले.पुढे मुंबईत आल्यावर त्यांनी संगीतकार झेंडे खान बरोबर शागिर्दी पत्करली आणि रणजित मुव्हिटोनचे पगारी नोकरदार झाले परंतु तिथल्या राजकारणाला कंटाळून, त्यांनी मधोक यांच्या मदतीने प्रकाश स्टुडियोत प्रवेश केला. याचा परिणाम असा, नंतरच्या उत्कर्षाच्या काळात त्यांनी रणजित  स्टुडियोकडे ढुंकूनही बघितले नाही. 
आरंभीच्या म्हणजे १९४० च्या सुमारास, आपल्या कमला सूरवात केल्यामुळे असेल पण नौशाद यांनी अत्यंत वेगवेगळ्या आवाजासाठी संगीत रचना केल्या. आवाजातील विविधता आणि सांगीत गुणवत्ता या बाबतीत किती व्यापक पट्टा धुंडाळला होता, हे बघावे लागेल. जोहराबाई, अमीरबाई, नूरजहाँ, सुरेंद्र, सैगल, उमा देवी, दुराणी, शमशाद, मुकेश, सुरैय्या, रफी, तलत, मन्ना डे, हेमंत कुमार, लताबाई, आशाबाई, सुमन कल्याणपूर इत्यादी नावे घ्यायला लागतील. त्यांची वारंवार सुधारित केलेली आणि  बांधणीच्या गीतांची अंतिम रूपे लक्षात घेता गायकांच्या तब्येतीवर, मूडवर अथवा तत्कालस्फूर्त गाण्याच्या क्षमतेवर नौशाद अवलंबून राहात नव्हते, हे ध्यानात येऊ शकते. याचा परिणाम स झाला, पार्श्वगायनपूर्व काळातील त्याकनही गाणी ही नीटसपणे रचलेले पठणाचे साचे वाटतात. याउलट पार्श्वगायनोत्तर काळातील सांगीतिक रचना त्यांच्या महत्वाकांक्षेची उदाहरणे वाटतात. संकलित परिणाम असा, "बैजू बावरा","मदर इंडिया","मुगले आझम","कोहिनूर" हे चित्रपट त्यांच्या चांगल्या कामगिरीचे प्प्रातिनिधिक नमुने वाटतात. 
एक संगीतरचनासंबद्ध बारकावा असा टिपता येतो, चित्रपटांत गाणे या क्रियेपेक्षा चित्रपटगीत हे गुणवत्तेने निराळे असते आणि तसे असावे, ही संकल्पना पक्केपणाने रुजवम्यात नौशाद आपल्या कसोशीच्या प्रयत्नाने यशस्वी झाले. चित्रपटगीताच्या बांधणीची एक विशिष्ट पण काहीशी अंदाज करता येईल अशी कल्पना अथवा चौकट त्यांनी सुरेख रुजवली. सांगीत प्रास्ताविक मुखडा, मधले संगीत, सुमारे ३ कडवी आणि कधीकधी ललकारीपूर्ण शेवट अशी रचना केली म्हणजे चित्रपटगीत उभे राहते, असे जणू त्यांनी एक सूत्र तयार केले. बारकाईने रचलेली, परिश्रमपूर्वक तालीम घेतलेली आणि म्हणून सर्वदूर विकली जाणारी ती "नौशाद गीते" असे म्हटले जाऊ लागले. 
चित्रपट गीताची बांधणी व संबंधित साचा हळूहळू कसा पक्का होत गेला हे नीटपणे समजून घेतले पाहिजे. कारण त्यामुळेच भारतीय आणि नौशाद, या दोहोंच्या वाटचालीवर प्रकाश पडू शकतो. या संदर्भात उदाहरणादाखल म्हणून पाहण्याजोगी, थोडीशी एकरेषात्मक आणि काहीशी तांत्रिक विश्लेषणाकडे झुकलेली मांडणी करता येते.
_______________________________________________________________ 
गीत -  वर्ष           गायक-गायिका        चित्रपट          गीताचा अवधी      गीताची बाह्यरेखा 

मिलके बिछड गयी   अमीरबाई             रतन               २.३०  मि.          मु. (६) सं.च. (११)
(१९४४)                                                                                            का.च. (८)

जवां हैं मुहब्बत          नूरजहाँ             अनमोल घडी     २.३० मि.           मु.(१०) सं.च. (१२)
(१९४६)                                                                                            का.च. (२)

जानेवाले से मुलाकात  लताबाई               अमर             ३ मि. पेक्षा         मु.(५) सं.च.(८) 
१९५४                                                                        जास्त                का.च. (८) 

मेरे महेबूब                   रफी               मेरे महेबूब          ६.१५ मि.            मु. (१३) सं.च.(५)
१९६३                                                                                                  का.च.(२६)
________________________________________________________________
मु. : - मुखडा, पूर्ण वा अंशत:
सं.च. : - संगीत चरण, वाद्यावर आधीच्या काव्यचरणाची चाल पुन्हा ध्वनित वा पुढील 
             चरणांच्या चालीची पूर्वतयारी करणारा. 
का.च. : - काव्यचरण. त्याच किंवा किंचित बदललेल्या चालीसह काव्याचा चरण ध्वनित 
               अंशतः किंवा पूर्णतः
________________________________________________________________

विविध काळातील गीतांची सांगीत बाह्यरेखा असे दर्शविते, ली रचनाकाराच्या चालीत सहेतुक अथवा अर्थपूर्ण पुनरावृत्तीस बरेच महत्व आहे. उदाहरणार्थ मुखडा पुनरावृत्त झाल्यास चाल मनात ठसते. मुखड्याच्या संगीताची किंचित पुनरावृत्ती झाली तर चॅन आणि शब्द, दोहोंचाही ठसा अधिक गडद होतो. लागोपाठ येणारे अंतरे फार क्वचितवेळा निराळ्या चालीत असतात. एकंदर परिणाम, चाल घट्ट विणीची होते. अर्थात सांगीत नवविधाने अधिक असती तर चाल अधिक दाट झाली असती. नौशाद यांची गीते ध्यानात राहतात कारण ती जाणीवपूर्वक चाल बांधत जाण्याच्या तत्वानुसार रचलेली असतात. "मैं दिल का दर्द" (सुरैय्या - अनमोल घडी - १९४६) या गीतात किंचित वेगळी युक्ती वापरली आहे. छंदांचा चरण पुनर्वितरित करून शब्दसरणीचे घनत्व कमी केले तरी लयबंध तोच आहे. त्यामुळे विविधता येते परंतु छोटी एकके समान राहतात. 
नौशाद यांच्या कार्याचे महत्व सांगताना, अनेकदा २ बाबींचा उल्लेख केला जातो - हिंदुस्थानी रागांचा त्यांनी केलेला सुजाण वापर आणि उस्ताद अमीर खान, पं. दि.वि.पलुस्कर व बडे गुलाम अली खान यांच्यासारख्या रागदारी संगीतकारांना चित्रपटात गायला लावल्याची त्यांची कामगिरी. जवळजवळ १०० वादकांचा ताफा उपयोजणे हा देखील एक विशेष सांगितला जातो. याशिवाय त्यांनी हिंदी चित्रपटातील पाश्चिमात्य सांगीत विशेषांच्या प्रघाताविरुद्ध वारंवार आवाज उठवून हिंदुस्थानी रागांची शुद्धता पाळावी आणि भारतीय वाद्यांची कटाक्षाने योजना करावी, असा आग्रह धरला - याचीही तारीफ करण्यात आली. आणि तरीही सुदैवाने त्यांनी पाश्चात्य वळणाचा वापर केल्याचे उदाहरण आहे!! "तारारी तारारी"(सुरैय्या/रफी - दास्तान - १९५०) या गीतात वॉल्त्झची लय, पाश्चात्य निरर्थक ध्वनी ऐकावे. 
वर निर्देशित केल्याप्रमाणे तिन्ही शास्त्रोक्त गायकांच्या रचना विचारात घेऊ. आणि दुसरे उदाहरण घेऊन काही मुद्दे स्पष्ट करू. उस्ताद अमीर खान, पं. दि.वि.पलुस्कर (बैजू बावरा - १९५२) आणि उस्ताद बडे गुलाम अली खान (मुगले आझम - १९६०). संबंधित गायकांना साधारण उपलब्ध अवधी आणि विस्ताराचे ढोबळ विभाग इत्यादींविषयी काही सूचना देऊन ध्वनिमुद्रण झाल्याचे ध्यानात येते. वेगळ्या शब्दात, नौशाद यांच्या इतर रचनांप्रमाणे या रचना पूर्णतः पूर्वरचित अथवा बंदिस्त नव्हत्या. या तिन्ही गायकांच्या गायनशैलीशी परिचित असणाऱ्यांना प्रस्तुत गायन करणता आपली गायकी कुठे, कशी मुरडली, हे ध्यानात येईल. 
याउलट "मधुबन में राधिका" (रफी - कोहिनूर - १९६०) हे संपूर्ण पूर्वरचित क्लासिकल गीत आहे. शास्त्रोक्त गायन आणि नृत्य, यासाठीच या गीताची निर्मिती झाल्याचे समजते. या उद्दिष्टाच्या सिद्धीसाठी शास्त्रोक्त वाटावे असे दुवे ठिकठिकाणी पेरण्याची नेहमीची युक्ती नौशाद यांनी वापरली आहे. उदाहरणार्थ (१) हिंदुस्थानी शास्त्रोक्त संगीतात नेहमी सादर होणाऱ्या छोटा ख्याल या प्रकाराबरोबर अनेकवेळा अवतरणारा त्रिताल योजला आहे. (२) हमीर हा सर्वत्र प्रचारात असलेला  
राग फारसा न बिघडवता वापरला आहे. (३) छोटा ख्याल या प्रकारात मुखडा, अंतरा असे आणि मधले संगीत असे विभाग आढळतात. (४) प्राथमिक स्वरूपाचे आलाप - म्हणजे रागविस्तार करणाऱ्या सुरावटी - योजल्या आहेत. (५) तशाच प्राथमिक गुणवत्तेच्या ताना, जलदगती विस्तारासाठी योजलेल्या सुरावटी, रचून दिलेल्या आहेत. (६) सारंगाम म्हणजे रागात अंतर्भूत स्वरांचे स्वरनामांच्या उच्चारातून गायन पेरलेले आहे. (७)  गाण्यात "तिहाई" (म्हणजे सुरावट इत्यादींचे पूर्णतः किंवा अंशतः तीनदा सादर करणे) आहे. (८) "तराणा" गायन प्रकारचे सूचन  आहे. (९) "त्रिवट" हा गायनप्रकार सूचित करणारा पखवाजाच्या बोलांचा वापर आहे. (१०) सतार वादनातील "गत" हा रचना विशेष तसेच "झाला" हा वादनविशेषही आणला आहे. (११) कलासंगीतात असते तशी सांगीत गतीची वाढ केली आहे. (१२) सतार-तबला यांचे सवाल-जबाब ऐकवले आहेत. (१३) नृत्यरचनेसाठी वापरण्यात येणारे बोल म्हणवून घेतले आहेत. रफी मोकळ्या आवाजात गायले आहेत. रचनाकाराने अतिशय हुशारीने पॅकेज सादर केले आहे. थोडक्यात नौशाद यांच्या इतर सुबद्ध गीतांप्रमाणे हे एक आहे आणि अभिजात संगीताचा आभास करण्याच्या जादा पुण्यावर दावा करता यावा अशी परिस्थिती निर्माण केली आहे. 
आणखी याच तऱ्हेचे उदाहरण - "मोहें भूल गये सांवरीया" (लताबाई - बैजू बावरा) या वेळी सादरीकरणात काय आहे? भैरव रागाचे सूचन करणारी स्वरचौकट वापरली आहे (प्रत्यक्षात भैरव रागाच्या जवळ असणारा कलिंगडा राग आपण ऐकतो असे प्रतितास येते) चित्रपट संगीतात सर्रास वपणारा अर्धाताल - खेमटा आहे आणि लताबाईंचे उघडपणे भावनात्म भासणारे लगाव योजणारे गायन. म्हणजे पुन्हा रागदारी संगीताचा आभास उत्पन्न करणारे नेहमीचे पूर्णरचित, ढोबळपणे भावपोषक आणि लक्षात राहायला सोपे असे गीत नौशाद यांनी दिले आहे. 
याच चित्रपटात रफींनी गायलेले "मन तरपत हरी दरशन" हे गीतही आहे. काहीसा विरोधाभास असा, या गीतापेक्षा लताबाईंनी गायलेले गीत उजवे आहे, कारण ते निदान शास्त्रोक्त असल्याचा ठोस हक्क न सांगता दुरान्वये नाते सांगते. याउलट "मन तरपत हरी दरशन" ही रचना शास्रोक्तपणाचा पोकळ आव आणते,असे म्हटले पाहिजे. पातळ केलेल्या मालकंस रागाचे जादा किंवा नाटकीपणे भावुक सादरीकरण म्हणजे प्रस्तुत गीत. संयमित भावनात्मकता, साध्या किंवा गुंतागुंतीच्या सांगीत कल्पनांचे तत्कालस्फूर्त विधान आणि विस्तार, सूरावटींचा लय-तालाबरोबरचा सूक्ष्म खेळ हे कलासंगीताचे खास विशेष होत. रफीला दिलेले गीत म्हणजे शास्त्रोक्त प्रकारच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न केलेले साधारण गुणवत्तेचे गीत होय आणि हा दोष निश्चितपणे नौशाद यांच्याकडे जातो. 
 या प्रकारच्या अपयशाची संगती कशी लावायची? माहिती वा ज्ञानाचा अभाव असे कारण नसून शास्त्रोक्त संगीताचे स्वरूप काय, या विषयीच्या दुय्यम कल्पना रचनाकारांनी प्रथम पातळीच्या मानल्या गेल्या. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे मुळातच शास्त्रोक्त संगीताचे मूल्य, त्या विषयीच्या भ्रम समजुतींमुळे रचनाकारांनी अवास्तव मानल्या. शास्त्रोक्त चेतनेचा चित्रपटीय चौकटीत वापर कसा करायचा याबाबत संदिग्धता असणे, हेच होय. त्यामुळे यांसारख्या गीतांमुळे कलासंगीताचा प्रसार, रक्षण वगैरे झाले इत्यादी विधाने अत्यंत गैरलागू ठरतात. 
नौशाद यांच्या गीतांतील सांगीत आशयाचा विचार करायला लागल्यावर, त्यांच्या बहुसंख्य यशस्वी गीतांत उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागांतील लोक आणि धर्मसंगीतातील बांधणीची पुनर्रचना केल्याचे आढळते. त्यामुळे ठुमरी, दादरा आणि  कव्वाली इत्यादी प्रकारांत यशस्वी रचना करणे, हे तर्कशुद्ध ठरते. विशिष्ट चित्रपटीय मागणीसाठी आवश्यक ते यां प्रकारातील संगीत - सांस्कृतिक संकेतनौशाद उलगडू शकतात. पर्यायाने नौशाद यांच्या संगीताच्या आवाहनाचा पाया व्यापक होतो. खरे सांगायचे  झाल्यास,आपले संगीत लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून नौशाद विशिष्ट, नेमका लोकगीतप्रकर वापरण्यापेक्षा लोकगीतशैलीवर अधिक भर देतात. 
उदाहरणार्थ, लोकशैलीत एक खास प्रकारचा लगाव असतो. अनेक सांगीत आणि सांस्कृतिक कारणांमुळे अशा आवाजात एक प्रकारची धार असते. एकंदरीने रचनांचा कल द्रुत गतीकडे असावा.भावनापूर्णतेचा प्रत्यय देण्यासाठी चाल थोडी सुरांच्या बाहेर गेली तरी चालेल परंतु ती फार दीर्घ नसावीत आणि मुख्यतः त्यांच्या चालीत फार विविधता वा बदल नसावेत. (१) "मिल के बिछड गयी (अमीरबाई - रतन - १९४४), (२) जवां हैं मोहब्बत (नूरजहाँ - अनमोल घडी - १९४६). 
बांधणी आणि गती तसेच आवाहकता या बाबतीत लोकगीतांचे ठेके इत्यादी शास्त्रोक्त तालांपेक्षा निराळे पडतात. याही विशेषांचा नौशाद यांनी योग्य वापर करून घेतला आहे. याचा परिणाम असा होतो,लै कशीही असली तरीही नवे आवर्तन त्वरित कार्यान्वित होते. यावरून निष्कर्ष असा निघतो, लोकताल वापरणे म्हणजे निम्मी लढाई जिंकणे होय. याशिवाय द्रुत गती ठेवणे, दुगण करून पुन्हा मूळ लयीवर येणे याचा संकलित परिणाम असा, श्रोता सतत दक्ष राहतो. "हमारे दिल से न जाना" (लताबाई - उडन खटोला - १९५४), "नगरी नगरी द्वारे द्वारे"(लताबाई - मदर इंडिया - १९५७), "दो हंसो का जोडा" (लताबाई - गंगा जमुना - १९६१). लोकगीतांत अनेकदा सुरावटीची वाद्ये देखील ताल पुरवतात आणि याही विशेषाचा वापर नौशाद  यांनी यशस्वीपणे केला आहे. 
नौशाद यांची रफींनी गायलेली गीते ऐकूनही त्याची चाणाक्ष असे वर्णन करता येईल. हिंदी चित्रपट संगीतात, सुरेल, ताकदवान, भरीव आणि नाटकी पुरुष आवाज म्हणून रफींचा उल्लेख करायला हवा. उदाहरणार्थ "मेरी कहानी भुलने वाले" (दीदार - १९५१) या गाण्यात सांगीत उत्कर्षबिंदू ऐकणाऱ्यांच्या मनावर ठसवण्यासाठी आणि नाट्यात्म उच्चारण साधण्यासाठी म्हणून त्यांची शैली तारस्वरांचा मुबलक वापर करते. "आये ना बालम वादा कर के" (शबाब - १९५४) या गीतातही रचनेचे हेच धोरण आहे. "जिंदगी आज मेरे नाम से शरमाती हैं" (सन ऑफ इंडिया - १९६२) हे गीत जेंव्हा रचले तेंव्हा मोठे वाद्यवृंद ही नौशाद यांची खास बाब झाली होती. 
"मुगले आझम" मधील संगीत हे नौशाद यांच्या कलात्मकतेचे सुरेख उदाहरण ठरू शकते. "मोहें पनघट पे नंदलाल" हा दादरा खमाज पेक्षा गारा रागात बांधल्यामुळे एक सूक्ष्म बदल झाला आहे. यामुळे रचनेची सुरावट कमी गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे दादरा ठेक्याचा डौल आणि 'डोल आकर्षक झाला आहे. "प्यार किया तो डरना क्या" हा दुसरा दादरा देखील गीतातील निषेध-बंडाला वाचा फोडू शकतो. "बेकस पे करम किजीये" हे अभिमानपूर्ण विनंतीचे गीत केदार रागात बांधणे, याला दाद द्यायलाच हवी. "मुहोब्बत की झूठी कहानी पे रोये" या गीतासाठी दरबारी रागाची चौकट  वापरली आहे. या संपूर्ण चित्रपटात वापरलेल्या रागचौकटी अथवा त्यांची मार्गांतरे, यामुळे ज्या संस्कृतीचा स्टार दाखवला आहे, त्याचे आवाहकत्व निश्चितच वाढते. 
थोडक्यात भारतीय जनसंगीत कोटीतील हिंदी चित्रपटसंगीताचा आविष्कार एक जनताप्रिय उत्पादन म्हणून रुळावा यासाठी एक कार्यक्षम नमुना स्थिर करण्याच्या कार्यात नौशाद  वाटा फार महत्वाचा आहे आणि ही कामगिरी निश्चितच लक्षणीय आहे. 


Saturday, 9 November 2019

ओ.पी.नैय्यर

जनसंगीताच्या वाटचालीत एक मुद्दा (खरतर गरज नसताना) वारंवार मांडला जातो, या संगीत कोटीतील कलाकारांनी कलासंगीताचे पायाभूत शिक्षण घेणे आवश्यक (प्रसंगी "अत्यावश्यक") आहे अन्यथा निर्मितीचे बांधकाम ठिसूळ होते. हा मुद्दा इतका ठाशीवपणे मांडला जातो की जनसंगीतातील काही कलाकारांवर बरेचवेळा अन्याय केला जातो. किंबहुना त्यांनी निर्मिलेली कला ही कला मानायची का? असला दुधखुळा प्रश्न उपस्थित केला जातो!! कलासंगीताचे महत्व अधोरेखित करताना इतर कोटींतील संगीतावर आपण अन्याय करीत आहोत, याची पुसटशी जाणीव देखील दाखवली जात नाही आणि अहंमन्य वृत्ती डोके वर काढते. कलासंगीताचे महत्व अनन्यसाधारण आहे, हे मान्य परंतु इतर संगीतकोटी तितक्याच महत्वाच्या आहेत ज्यांमुळे "कला" ही बहुढंगी, लोकप्रिय आणि विस्तारक्षम होत असते. ओ.पी.नैय्यर  या संगीतकाराचा आढावा घेताना हा मुद्दा विशेषत्वाने विचारात घ्यायला लागतो. हाच विचार पुढे विस्ताराने मांडायचा झाल्यास, साधारणपणे ७० चित्रपटांना संगीत दिलेआणि त्यात ३ मुद्दे उपस्थित होतात. १) त्यांची गाणी गायला लताबाई उपलब्ध नव्हत्या (किंवा त्यांनीच जाणीवपूर्वक लताबाईना स्वीकारले नव्हते) २) त्यांना स्पष्टपणे कलासंगीताचे पायाभूत शिक्षण मिळाले नव्हते आणि ३) त्यांची पत्रिका अनेक कलाकारांबरोबर जमली नाही परिणामी त्यांना सांगीत वनवासात काल कंठावा लागला. या मुद्द्यांनाच विचारात घेऊन आपण काही वैशिष्ट्ये मांडू शकतो. 
(१) नैय्यर यांनी कोणत्या रुळलेल्या वाटा स्वीकारल्या आणि कुठल्या बाबतीत मार्गांतर केले हे समजण्यासाठी एक उदाहरण बघू. "देखो जादू भरे" (आसमान - १९५२) या गीताचा संदर्भ घ्यायला हरकत नाही. गीताचा आरंभ ठाशीव आणि गतिमान लयीत प्रारंभ होतो. प्रस्तुत गीतात त्रिताल तबल्यावर चमकदारपणे वाजतो आणि त्याच्या सह सतारीचे स्वर बांधीवपणा प्रदान करतात. गीताची आकर्षक लय पाहिल्याने उमटविते. दुसरा भाग असा, जरी गीताची पहिली ओळ "गौड सारंग" रागदारीत असली तरी क्षणार्धात संगीतकार आपल्याला बिहाग, तिलंग इत्यादी रागांच्या  सावलीत हिंडवून आणतो. याचाच वेगळा अर्थ असा, कुठल्याही रागाची चौकट नैय्यर यांच्या कल्पनाशक्तीला पाया पुरवतात असे नाही. हे विधान, वरील विधान - जनसंगीतासाठी कलासंगीताचा पायाभूत अभ्यास अत्यावश्यक नाही, याला बळकटी देऊ शकते. याउलट उदाहरण बघायचे झाल्यास, "छोटासा बालमा" हे गीत, गीत म्हणू यशस्वीपणे उभे राहते. या रचनेत देखील त्रिताल वापरला आहे पण रोगाबाबत खास आग्रह नाही. बागेश्री रागाची थोडी डूब दिली आहे, असेच फारतर म्हणता येईल. 
(२) त्यांच्या "टांगा" गीतांची विशेष वाखाणणी केली जाते. हा विशेष हिंदी चित्रपट संगीतात विशेष लक्षवेधी ठरलेला आहे. यात महत्वाचा मुद्दा असा आहे, या आविष्कारात लय आणि गती, चाल, हालचाल आणि शब्द याबाबतीत अनेक गोष्टींमध्ये विशेष लक्ष द्यावे लागते. रचनाकार या सर्व अंगांकडे लक्ष देऊ शकतो की नाही या मुद्द्यावर या गीतप्रकाराची रचना हे आकर्षक उदाहरण ठरते की नाही, हे अवलंबून असते. 
काहीही असो, "पिया पिया पिया" ( बाप रे बाप - आशा/किशोर) आणि "मांग के साथ तुम्हारा" (आशा/रफी - नया दौर) या रचना वरील मांडणीला पूरक म्हणून दाखवता येतील. या दोन्ही गीतांची लय आणि त्यांचे ताल असे आहेत की, कुणालाही संगीताचे शिक्षण न घेता त्यांचा मागोवा घेता यावा. गीताचे चरण ज्या चाळीच्या अनुषंगाने जातात त्या चालीत गुंतागुंत नाही. इतकेच नव्हे तर जर का शब्द बदलले तरी सुरावट तशीच असते. आणखी एक बारकावा मांडता येतो, दार मात्रेगणिक एक उच्चारावयव असतो. या विषेचं खास परिणाम असा, बहुतेकवेळा शारीर हालचालीस आमंत्रण मिळते. "हौले हौले चलो" (आशा - सावन की घटा) या टांगा-गीतात तर शेवटाला शिट्टी वाजलेले ऐकायला मिळते मात्र गीताच्या प्रवाहात थेट प्रवेश, मृदू वाद्यवृंदरचना आणि नायिकेच्या व्याकुळतेस सोबत होणारी तार शहनाई इत्यादी वाद्ये गीताची प्रभावी अंगे आहेत. 
(३) टांगा गीते जरी युगुलगीते म्हणून प्रसिद्ध असली तरी इतर रचना युगूलगीते म्हणून प्रसिद्ध झाली आहेत. ही गीते जरी वेगळी असली तरी या सर्वांना जोडणारा असा एक भावस्थितीवाचक असा स्वरसमूह समान असावा अशी शंका येते. उदाहरणार्थ "उधर तुम हसीन हो (रफी/गीता - मिस्टर अँड मिसेस ५५) आणि "आँखो ही आँखो में इशारा हो गया" ही गीते ऐकावी. पहिल्या गीतात कास्टानेटचा वापर आहे तर दुसऱ्या गीतात दादरा याचे खेचक वापर आहे. 
(४) याच प्रकारे सांगीतदृष्ट्या आकर्षक लय-ताल शोध आणखी एका ऐंद्रिय उत्तेजनापूर्ण गीत रचण्यास कारणीभूत होतो. यालाच "नाईट क्लब गीत" असे म्हणता येईल. (उलट्या बाजूने असे म्हणता येईल - भारतीय चित्रपट संगीतात रूढ असलेल्या "मुजरा" गीताचा एक हुशार आयात केलेला पाश्चात्य पर्याय असे म्हणता येईल) अर्थात गीताचे प्रयोजनही हेच प्रस्तुत असते. आता अशा गीतातील सारभूत सांगीत घटक कुठले? मोहिनी घालणारे, मोहविणारे, अशारीर प्रेम किंवा रूढीमान्य तसेच शिष्टसंमत प्रेमाविसरुद्ध बंड पुकारणारे भाव तसेच परकीय वाटणाऱ्या आणि चमकदार वाद्यध्वनींचा कौशल्यपूर्ण वापर आणि सर्वसाधारणतः मान्य भाषिक व उच्चारविषयक संकेतांना बिघडवणे, अशी यादी करता येईल. अखेरचा विशेष असा, अंतिमतः तयार होणारे गीत हे नृत्यगीत असणे जरुरीचे असते. "बाबूजी धीरे चलना", "हूं अभि मैं जवान" (गीता दत्त - आरपार), "आईये मेहेरबान" (आशा - हावरा ब्रिज) ही याची ठळक उदाहरणे आहेत. स्पष्ट बोलायचे झाल्यास, अशा प्रकारच्या गीतांना सूक्ष्म सुरेलपणापासून सारखे दूर जायचे असते. संबंधित गायक वा वादक यांना सुरावट दाखवताना नियंत्रित पद्धतीने बेसूर होता यावे यासाठी या गीतांत हेतुपूर्वक स्वरिक जागा निर्माण केलेल्या असतात. मानवी मोहास बळी पडून, शरीराच्या मागण्यांस मान तुकवून जणू काही संमत नैतिक कक्षेच्या बाहेर जाण्याच्या आशयास चालीतही जणू काही समांतर बांधणी उभारलेली असते! परिणामतः सांगीत परिमाणात आवाजाची आघातपूर्ण निर्मिती, उच्चारात जाणीवपूर्वक व निवडक बिघाड, न-स्वरी वाद्यांचा मुबलक वापर इत्यादी घटकांचा आढळ निरपवाद होतो. उदाहरणार्थ "वो हसीना दर्द दे दे" ( आशा - हम साया). भारतीय संदर्भात बोलायचे आल्यास, अशा रचनांत राग कल्पनेस संपूर्णपणे बाजूला सारलेले असते. त्याचप्रमाणे अर्धाताल आणि द्रुतलयीवर भरपूर भर दिलेला असतो. 
प्रस्तुत गीतांच्या परिणामकारकतेचा उलगडा करायचा झाल्यास, या आणि अशा अनेक मुद्द्यांचे सोदाहरण विश्लेषण विस्ताराने करावे लागेल. 
(५) नैय्यर यांच्या संगीतातील आणखी महत्वाचे ( आणि अनेकवेळा टीका विषय झालेले) वळण १९५७ पासून - "तुमसा नहीं देखा" या चित्रपटापासून - प्रकाशात आले, असे म्हणता येईल. एक महत्वाची बाब अशी, के या प्रकारच्या नृत्यसंगीताशी वा गीताशी या संगीतकाराचे नाव निगडित झाले असले तरी त्यांच्या विशिष्ट रूपाचे कारण असे की, संबंधित अभिनेता शम्मी कपूर याने बृत्याचे शिक्षण घेतले नव्हते पण त्याच्याजवळ एक कसब होते - कुठंही ऊर्जापूर्ण हिसके देत, शरीर नि:संकोचपणे वाकविणे, हलविणे इत्यादी क्रिया त्याला विनासायास जमत असत. त्यामुळे त्याची शैली आगळी ठरली. यायचाच दुसरा परिणाम, अशा नृत्यशैलीला पूरक असे संगीत देखील निराळे लागणे अपरिहार्यच होते. वास्तविक हे सारे संगीत नव्हे, यात काही सौंदर्य नाही अशी टीका खूप झाली पण हा सारा प्रकार नि:संशय लोकप्रिय झाला हे नक्की. 
(६) या सर्व पार्श्वभूमीवर नैय्यर यांना अनेकदा लयगीताचे बादशाह का म्हणतात, याचा उलगडा होईल. पण तरीही एक गोष्ट मांडायलाच हवी, मधुर सुरावटी किंवा चलने याही बाबतीत हा संगीतकार खात्रीने सर्जनशील होता. कुठलाही रचनाकार रचनाप्रक्रियेत एकांगी असूच शकत नाही. " जा जा जा रे बेवफा" (आर पार) या सारख्या यशस्वी गीतांत लयवाद्यांचे ठळक तसेच बटबटीत ठोके नाहीत. परंतु तंतुवाद्यांच्या स्पंदातून या गीताला लयबंध पुरवला जातो आणि तो लक्षणीय आहे. दुसरे एक गीत बघूया, "चैन से हमको कभी" (आशा -प्राण जाय पर वचन ना जाय) या गीताची गणना, नैय्यर यांच्या अतिशय महत्वाच्या रचनेत गणता येईल. वेदनेने भारलेल्या, काहीतरी गमावलेल्या हळवेपणातून पावले जड झालेल्या या गीताच्या साध्या तरीही आकर्षक चालीला लयबंध कसा पुरवला जातो ते लक्षातही येत नाही. "जाईये आप कहां" या गीतातही, द्रुत लय बांधून सुद्धा एक कारुण्याची झालर कशी पसरली आहे, ते उल्लेखनीय आहे, चक्राकार जाणारे सतारीचे स्वर आणि आकाराने उतरत जाणारा आवाज आणि पूर्ण वाद्यवृंद एकांतरतेने येऊन ही नेमकी किमया साधतात.  
(७) एक महत्वाचा पण थोडासा दुबळा भाग असा, आपल्या आकर्षक लयबंधाशी तुल्य अशी चाल जर का मिळाली माही तर एका महत्वाच्या रचनासुत्राचा प्रत्यय येतो - लयबंधाने लक्ष वेधले जाते. तरीही मन गुंतते ते निव्वळ सुरावटीने!! "दिल दे दिया" (मुसाफिरखाना), "बन धडकन" (मिस कोकाकोला) ही गीते अयशस्वी ठरतात. याचे नाहत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या सुरावतींना केंद्रबिंदू मिळत नाही. याउलट, "ठंडी हवा काली घटा" (मिस्टर अँड मिसेस ५५) या गीताची साधी, पुनरावृत्तीयुक्त चाल देखील मन वेधून घेते. 
(८) आता एक अति महत्वाचा मुद्दा. भारतीय सं गीतरचनाकारांना त्यांच्या शास्त्रोक्त संगीताच्या झुकवानुसार जोखणे योग्य नाही आणि गरजेचे देखील नाही. परंतु दुर्दैवाने भारतीय रागसंगीताचे पायाभूत किंवा तत्संबंधीची सर्वसाधारण माहिती असणे याला नको तितकी प्रतिष्ठा लाभलेली आहे. आणि त्यालाच एकमेव निकष म्हणून मान्यता मिळालेली आहे!! या दृष्टीने बघता, नैय्यर यांना भारतीय रागसंगीताचे तीव्र असे आकर्षण होते, असे वाटत नाही. अशा प्रकारच्या रचनाकारांचा दृष्टिकोन दोन प्रकारे असतो. एक तर ते सरळ, सरळ आहे तशी सुरावट वापरतात कारण विशिष्ट गीतप्रकार हाच मुळी एखाद्या रागात किंवा त्याच्या सावलीत मुरलेला असतो. दुसरी काही उदाहरणे अशी आहेत, की त्यांनी एखादी रागचौकट जाणूनबुजून धुंडाळलेली असते. उदाहरणार्थ "जब बादल लहराया" (गीता दत्त - छूमंतर) हे गीत सारंग रागाच्या छायेत वावरते, याचे महत्वाचे कारण म्हणजे अनेक प्रांतातील भारतीय लोकसंगीतात वर्षागीते याच प्रकारची असतात. 
याउलट, नैय्यर यांनी रागसंगीताची जाणूनबुजून केलेली योजना तपासल्यास काय आढळते? एक असे की, त्यांच्या शास्त्रोक्त रचना बहुतेकवेळा हिंदी चित्रपटसंगीतात सर्वसाधारणतः, सरसकट आणि सहज वापरल्या गेलेल्या रागांत असतात. उदाहरणार्थ, "जोगिया मेरे घर आज (उस्ताद अमीर खान - ललत - रागिणी), "रातभर का हैं मेहमान अंधेरा" (सोने की चिडियाँ - जोगिया), "आप युंही अगर" (रफी - केदार), "इशारो इशारो में" (आशा/रफी- पहाडी), "बेकसी हद पे" (आशा - देस) या रचना आणि त्यांची चलने त्या रंगाची चलनी नाणी म्हणता येतील. इतकेच नव्हे तर या गीतांत नैय्यर यांनी आकर्षक सांगीत विलासासाठी प्रचलित रागांत का होईना, पण नवे मुखडे समोर आणल्याचे दिसत नाही. नवे मुखडे बांधणे हे नेहमीच सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येते. 
नैय्यर यांच्या संगीतामुळे काही वेधक प्रश्न उभे राहतात. मध्ये मध्ये बाराच काळ ते बाजूला पडले नसते तर त्यांनी अधिक चांगले संगीत दिले असते का? की खंडित स्फूर्ती येणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना करावी का? आणखी एक निरीक्षण, स्त्री आवाजांसाठी केलेल्या स्वररचना त्यांच्या पुरुष स्वरचनांपेक्षा अधिक उठावदार आहेत का? हे आणि आणखी काही प्रश्न वर उपस्थित केले आहेत, त्याचा जरूर विचार केला जावा.