Saturday, 28 January 2023

साऊथ आफ्रिका - खाद्यसंस्कृती

१९९४ साली मी प्रथम साऊथ आफ्रिकेत पाऊल टाकले तेंव्हा इथे १६ वर्षे काढीन अशी सुतराम कल्पना नव्हती. साधारणपणे ४,५ वर्षे काढून पुन्हा भारतात परतायचे. इतपत अपेक्षा होती. परंतु डर्बन विमानतळाचे पहिलेच दर्शन (त्यावेळी भारतातून थेट डर्बन अशी विमान सेवा होती, पुढे जोहान्सबर्गला सेवा सुरु झाली) आश्चर्यचकित करणारे होते आणि ते चित्र बऱ्याचपैकी तसेच शेवटपर्यंत राहिले. पीटरमेरित्झबर्ग इथे सुरवातीला भारतीय वंशाच्या लोकांशी ओळखी झाल्या. अर्थात ऑफिसमध्ये देखील बव्हंशी भारतीय वंशाचेच लोक नोकरीसाठी होते. सुरवातीला अर्थातच भारतातून आलेल्या लोंकांशी ओळख होणे, वाढणे क्रमप्राप्तच होते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी फारशा बदलण्याची संधी नव्हती परंतु पुढे भारतीय वंशातील लोकांशी मैत्री झाली आणि त्यांच्या घरी जाण्याचे प्रसंग आले. वास्तविक, माझा देह तोपर्यंत भारतीय मसाल्यांवर पोसलेला होता आणि तिथल्या प्रत्येक पदार्थाची चव घेताना, भारतीय पदार्थाची चव कशी आहे, अशा तुलनेतच खाऊन बघितली. अधून मधून बाहेर हॉटेलमध्ये जात असे आणि मुद्दामून गोऱ्या लोकांच्या हॉटेलमध्ये जात असे. तिथले फिश किंवा चिकन, सुरवातीला खाताना चवीचा प्रश्न यायचा परंतु अशा हॉटेलमध्ये जाताना, ऑफिसमधील मित्र सोबत असायचे आणि त्यामुळे त्यांच्यासमोर चवीबद्दल कसे बोलायचे? हा संकोच असायचा. गोऱ्या लोकांच्या हॉटेलात चिकन सारखे पदार्थ, बव्हंशी मीठ आणि काळी मिरपूड, इतपतच मसाले लावलेले असायचे. अर्थात प्रथम, प्रथम खाताना, ते चिकन पचवणे काहीसे जड गेले. मनात सारखा हाच विचार यायचा, मी यांच्या देशात आलो आहे, तेंव्हा यांच्या अन्नावर टीका कशी करायची? हाच प्रकार मासे खाण्याबाबत व्हायचा. पुढे जसे भारतीय वंशाच्या लोकांच्या घरी जायचे प्रसंग आले तेंव्हा काहीशी मिळतीजुळती चव चाखयला मिळाली. तरीही मालवणी, कोकणी चवीचा प्रश्नच नव्हता. शाकाहारी पदार्थ याच चालीवर बनवलेले असायचे. चिकन उकळत्या पाण्यातून काढायचे, त्याला मीठ, मिरपूड लावायची आणि "चिकन करी" बनवताना, थोडे तिखट, हा;हळद आणि त्यांचा म्हणून खास बनवलेला मसाला घालून ते चिकन, तेलावर (तेल देखील अत्यंत माफक) शिजवायचे. मालवणी चवीला सोकावलेल्या अनिलला, हे चिकन बेचव वाटले तर काय नवल. पुढे मीच स्वतंत्र राहायला लागलो आणि बाजारातून आपले भारतीय मसाले आणले (प्रत्येक शहरात आता इंडियन स्टोअर असते आणि तिथे अप्रतिम भारतीय मसाले, डाळी, तांदूळ,पोळ्यांचे पीठ आणि जवळपास सगळेच भारतीय पदार्थ मिळतात). आपली चव डोळ्यासमोर ठेऊन चिकन बनवले आणि तेंव्हा ३,४ वर्षे तृषावलेला जीव शांत झाला. एव्हाना, मला लोकल पदार्थांची सवय झाली होती. पुढे Standerton सारख्या गावात नोकरी करताना, माझ्या हाताखाली, बरेच गोरे कामाला होते तसेच आमच्या बृवरीचा जनरल मॅनेजर - डेव्हिस, गोरा होता, त्याच्याशी माझी नाळ जुळली. दुपारच्या जेवणाला आम्ही एकत्र जेवायला बसत होतो. अधून मधून तो मला एखादा पदार्थ देत असे. मी केलेली उसळ देखील त्याला पहिल्या घासात अवघड झाली, इतकी की पाणी पिताना सुद्धा त्याला ठसका लागला होता. आपला "गरम मसाला" त्याच्या घशाखाली काही उतरला नाही. त्यामुळे मीच त्याने दिलेले पदार्थ खात होतो. तोपर्यंत साऊथ आफ्रिकेत ९,१० वर्षे झाली होती तरीही मी पूर्णपणे "साऊथ आफ्रिकन" होऊ शकलो नाही आणि याचे मुख्य कारण, माझी दरवर्षी भारतात यायची सवय!! १६ वर्षे साऊथ आफ्रिकेत होतो परंतु प्रत्येक वर्षी मुंबईला यायचा परिपाठ मी ठेवला होता. यात आर्थिक प्रश्न होते परंतु घरच्यांची भेट त्यापेक्षा महत्वाची असायची. डेव्हिस कडे मात्र मला गोऱ्या लोकांची खाद्यसंस्कृती व्यवस्थित समजली. पुढे त्याच्या घरी ख्रिसमस साठी गेलो असताना, त्याच्याकडे नकळत का होईना पण "बीफ" खाल्ले, इथेच त्याचवेळेस "टर्की"चा आस्वाद घेतला. इथे "तिखट" खायचे म्हणजे "पेरीपेरी" मसाला वापरायचा. अर्थात आपल्या भारताच्या तुलनेत हे तिखट अत्यंत मचूळ म्हणायला हवे. एक गंमत, मी जेंव्हा Standerton इथे नोकरीसाठी आलो तेंव्हा सुरवातीला कंपनीने मला एका गोऱ्या मुलीच्या खाणावळीत राहायची आणि जेवायची सोय केली होती. मीजवळपास ३ आठवडे तिथे राहिलो आणि अर्थातच तिच्याशी माझी चांगली ओळख झाली. तेंव्हा ती एका गोऱ्या पुरुषासोबत Live I Relation मध्ये रहात होती. पुढे मी घर घेतले आणि ती जागा सोडून दिली. आता इतकी चांगली ओळख आहे म्हणून एका रविवारी सकाळी, त्या दोघांना मी घरी जेवायला बोलावले. दोघेही गोरे म्हणून, मी बिर्याणी करताना, मसाला जरा जपूनच वापरला होता. त्यातून रविवार दुपारचे जेवण म्हणून घरात जास्तीच्या बियर बाटल्या आणून ठेवल्या होत्या. अर्थात जर का बिर्याणी झेपली नाही तर मासे तळायचे बाजूला ठेवले होते. दोघेही घरी आले आणि मी बियर कॅन्स उघडले आणि चियर्स सुरु झाले. थोड्या वेळाने टेबलावर बिर्याणी आणून ठेवली आणि पहिल्याच घासाला, त्या मुलीचा जीव टांगणीला लागला!! डोळ्यांत पाणी आले. लगेच मी फिश तळायला घेतले आणि तिचे जीव भांड्यात पडला!! तेंव्हा पासून मी कानाला खडा लावला, घरी कुणाही गोऱ्या व्यक्तीला किंवा पुढे काळ्या लोकांशी ओळख झाली, तेंव्हा त्यांना देखील घरी बोलावले नाही. भेट बाहेर, एकतर त्यांच्या घरी किंवा हॉटेलमध्ये. एकदा काळ्या मित्राच्या घरी जायचा प्रसंग आला. आमंत्रण नाकारणे अशक्य होते. साऊथ आफ्रिकेत, घरी आल्यावर चहा, कॉफी विचारण्याऐवजी ड्रिंक्स विचारले जाते, विशेषतः शनिवार किंवा रविवार असेल तर अधिकच आग्रह केला जातो. म्हटले तर तिथे चिकन केले होते पण त्यांचे मसाले इतके "उग्र" असतात की ताटात घ्यायच्या आधीच वासाने नाक दरवळून गेले!! केवळ मित्राचा मान राखायचा म्हणून मी ते चिकन थोडेसे खाल्ले पण त्यांनी कुठला मसाला वापरला, हे विचारायचे धाडस मात्र झाले नाही. पुन्हा म्हणून काळ्या मित्रांच्या घरी जायचा प्रसंग आला नाही, मी आणू दिला नाही. आता या देशाची खाद्यसंस्कृती काय? असा जर प्रश्न उभा राहिला तर बहुतांशी अमेरिकन हॉटेलकडे बोट दाखवायला लागेल. शनिवार सकाळ, शनिवार तर, रविवार सकाळ, या वेळा बव्हंशी साऊथ आफ्रिकेने अशा हॉटेल्ससाठी राखून ठेवलेल्या असतात!! केवळ मॉलमधील हॉटेल्स नसून बाहेरील हॉटेल्स तुडुंब भरलेली असतात. ड्रिंक्स हा टेबल मॅनर्स म्हणून गणला जातो आणि मग त्यासोबत, फ्रेंच फ्राइज!! पुढे मग मेन कोर्स. हे सगळे करण्यात एकत्र दुपार होते किंवा रात्र पसरते. बीफ तर घासाघासाला लागते. बदल म्हणून कधी तरी पोर्क, हॅम्स किंवा फिश. गोरे काय किंवा काळे काय, यांच्या घरातील स्वयंपाक घरे चकाचक असतात, कारण घरी फारसे काही करायचे नसते. यांचे दुपारचे जेवण म्हणजे सॅन्डविच आणि ते देखील "कोल्ड मीट" आणि मेयोनीज बरोबर. इथले लोकं मेयोनीज प्रचंड प्रमाणात खातात. मग ते सॅन्डविचमध्ये असते किंवा सॅलडमध्ये असते. कधी कधी तर दोन पावाच्या मध्ये फक्त मेयोनीज घालून खातात. यांच्या आयुष्यातून पाव वगळला, तर हे लोकं कसे जगातील? हा प्रश्नच आहे, इतका पाव हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. अर्थात इथे असंख्य प्रकारचे पाव मिळतात. पाव आणि पेस्ट्रीज, याच्यावर हा देश अवलंबून आहे. पुढे मी देखील पावाला चटावलो होतो. विशेषतः गार्लिक बटर सह पावाचा रोल खाणे, हा आनंद असायचा. मॉलमधील "पिक एन पे" सारख्या अवाढव्य दुकानात गेलो की कुठला पाव घ्यायचा? या प्रश्नावर मती गुंग व्हायची. मग, मागील आठवड्यात कुठला घेतला होता, हे आठवून मग यावेळच्या पावाची निवड व्हायची. साऊथ आफ्रिकेत मी १६ वर्षे काढली खरी पण तिथल्या खाद्यसंस्कृतीपेक्षा मला तिथली मद्यसंस्कृती अधिक भावली!! विशेषतः "कॉकटेल्स" तर इतक्या विविध प्रकारची मिळतात की मन दि:ढमूढ व्हायचे!! केवळ कॉकटेल्स नव्हे तर निरनिराळ्या चवीच्या बियर्स तिथे मिळायच्या. आज भारतायेईन, १२ वर्षे व्हायला आली आणि ही संस्कृती मात्र मी फार "मिस" करतो.

Tuesday, 24 January 2023

डायलिसिस - एक अनुभव

आज नेहमीप्रमाणे बॉंबे हॉस्पिटलमध्ये पहाटे ५.३० वाजता डायलिसिस करायला गेलो. गेले काही महिने मी पहाटेच जातो.त्यात मोठा फायदा, दोन्ही वेळेस घरचे जेवण मिळायला लागले. दुसरा फायदा, सगळं दिवस तुम्ही सजगपणे घालवू शकता. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे, डायलिसिसची सायकल (४ तासाची सायकल असते) संपली की तुम्हाला मशीनपासून वेगे केले जाते आणि हाताच्या शिरांवर घुसलेल्या (अर्थ शब्दाश: घ्यावा) सुया बाहेर काढून तिथे गॉज कॉटनचे बँडेज बांधले जाते. हे बँडेज अंगावर कमीतकमी ४ तास बाळगावे लागते. पूर्वी सुरवातीला मी दुपारच्या ३ वाजताच्या बॅचमध्ये जात होतो. आता दुपारी ३ वाजता सुरु होणार म्हणजे संपायला संध्याकाळचे ७ व्हायचे. त्यापुढे हातावर भलेमोठे बँडेज बाळगायचे!! परिणामी रात्रीची झोप कमी झाली आणि मानसिक त्रास व्हायचा तो वेगळाच. आता मी या सगळ्या उपचारांना सरावलो आहे. मला सुरवातीचे दिवस आठवले कारण आज माझ्या हातात रक्ताची मोठी गुठळी झाली. डायलिसिस चालू असताना, असे काही होणे, भयंकर त्रासदायक असते. वास्तविक वेदना होत नाहीत पण हातातून रक्ताची धार लागली आहे, हे दृश्य काही सुखावह नव्हतेच. मी झोपलेला बेड रक्ताने भिजायला लागला आणि मी परिचारिकेला हाक मारली आणि रक्त गालात असल्याचे दाखवले. तिने लगोलग डॉक्टरला बोलावले आणि ४,५ मिनिटे मशीन बंद करून, तो क्लॉट काढून जागा स्वच्छ केली आणि पुनश्च डायलिसिस सुरु झाले. वास्तविक डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णाला अनुभवाला अधूनमधून सामोरे जावे लागत असते. फक माझी मानसिक तयारी नव्हती. आज घरी आलो आणि गेले ९ महिने डोळ्यांसमोर आले. १ मे २०२२ रोजी माझी डायलिसिस ट्रीटमेंट सुरु झाली. सुरवातीला माझा समाज असा होता, फार तर ५,६ सायकल्स संपल्या की मी पूर्ववत आयुष्य जगायला सुरु करिन पण प्रत्यक्षात, आत आयुष्यभर करायला लागणार, ही वस्तुस्थिती लवकरच ध्यानात आली. म्हटले तर हा मानसिक धक्काच होता पण मीच मला समजावले. सुरवातीला माझे शरीर तितकेसे तयार नव्हते, हे आता लक्षात आले कारण सुरवातीच्या २,३ सायकल्स पूर्ण करून घरी आलॊ आणि जेवणानंतर थाळी धुवायला खुर्चीवरून उठलो आणि माझा तोल जाऊन, मी जमिनीवर बसकण मारली. हा अनुभव मलाच अवाक करणारा होता, हे असे होईल, अशी पहिल्या अनुभवापर्यंत तरी कल्पना केली नव्हती. पुढील २ महिन्यानंतरच्या सायकलच्या वेळी तर, मी पहाटेच्या बॅचला जायला लागलो. अशाच एका प्रसंगी, जेवण झाले आणि पुन्हा खुर्चीत बसायला पाऊल टाकले आणि माझा तोल गेला!! नशिबाने घरात त्यावेळी धुणी,भांडी करणारा गडी काम करीत होता आणि त्याला मोठा आवाज ऐकायला मिळाला. त्याने, मी जमिनीवर पडल्याचे बघताच, मला आधार देऊन, पलंगावर झोपवले आणि अंगावर चादर टाकली. मी लगोलग झोपेच्या आधीन झालो. असे अनुभव फार नाही पण ४ वेळा आले पण पुढे मलाच कळले, अशा वेळेस स्वतःला कसे सावरून घ्यायचे. यात एक गोम अशी आहे, डायलिसिस पूर्ण होते तेंव्हा तुमचे कमीतकमी १.५० ते २ किलो वजन कमी होते आणि हे शरीराला झेपणे अवघड जाते. पुढे मनाची सवय करून घेतली. आज तर मी डायलिसिस करून आलो आहे आणि हा लेख लिहायला बसलो आहे!! गेल्या १० महिन्यात माझे ७४ किलो वजन, आज ६२ किलो इतके उतरले आहे. याचा परिणाम शरीरावर होणारच होता, फक्त मी अनभिज्ञ होतो, इतकेच. आता हा सगळं खेळ माझ्या आकलनात आला आहे आणि आता यातून सुटका सहजासहजी होणार नाही, हे समजले आहे. एक तर डायलिसिस हा उपचार नसून,बिघडलेल्या किडनी फंक्शन्स सुरळीत केली जातात. किडनी बिघडली म्हणजे एकाच उपाय हाती असतो, शरीरात नवीन किडनी बसवणे. अर्थात खर्चाचा भाग बाजूला ठेवला तरी शरीरात नवीन किडनी बसवणे आणि आपल्या शरीराने मेनी करणे, ही प्रक्रिया अतोनात किचकट आहे आणि यश मिळेलच याचीखात्री कुणीही देत नाही, कारण आपल्या शरीरातील चलनवलन अचूकपणे आजही शास्त्राला यश मिळालेले नाही. आज बॉंबे हॉस्पिटलमध्ये १३ आणि १४वा मजला फक्त डायलिसिस साठी राखून ठेवलेला आहे. थोडक्यात सकाळी ७ वाजता पहिली बॅच सुरु होते, पुढील बॅच ११ वाजताची आणि शेवटची बॅच दुपारी ३ वाजता असते आणि कुठल्याही बॅचमध्ये एखादा पलंग रिकामा आहे, असे अजिबात घडत नाही!! त्यामुळे समजा तुम्ही, तुमची वेळ चुकवली तर हॉस्पिटल घरी फोन करतात आणि का आला नाहीत, याची चौकशी करतात आणि त्या रुग्णाला दुसऱ्या वेळी सामावून घेणे फार जिकिरीचे असते, एकदा मला हा अनुभव आला होता. खरंतर इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक बाब ठामपणे माहीत असते आणि ती म्हणजे हळूहळू आपण मृत्यूच्या दरवाजात जात आहोत!! हे लिहू/बोलू नये पण हे परखड वास्तव आहे. मला इथे २,३ रुग्ण भेटले होते आणि त्यांनी माझ्याशी बोलून दाखवले होते. इथे सगळे मनातल्या मनात झुरत असतात. अगदी मी देखील, जरी मी वरकरणी दाखवत नसलो तरी. जसे वय वाढत जाते, तशी डायलिसिसची उपयुक्तता कमी होते आणि अटळ परिणामांना सामोरे जावेच लागते. दुसरा तरुणोपाय नसतो. इथे काही रुग्णांच्या समवेत त्यांचे नातेवाईक येतात आणि त्यांचे चेहरे निरखणे, हा आणखी भोग असतो. वरकरणी सगळे हसत असतात आणि चेंडूला पाण्यात दाबून ठेवण्यासारखा असफल खेळ असतो. कुणीही काहीही बोलत नसते कारण प्रत्येकाला याचा शेवटकाय आहे, याची पूर्ण कल्पना असते. इथेच मला काही रुग्ण गेली १८ वर्षे डायलिसिस घेत असल्याचे समजले. ऐकले आणि मी थक्क झालो. त्याचे वय माझ्याच आसपास आहे म्हणजे अर्धे आयुष्य हॉस्पिटलच्या बेडवर गेले. कुठली दुर्दम्य इच्छाशक्ती, त्यांनी आजमितीस धरून ठेवली आहे? प्रश्नच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे येणाऱ्या रुग्णात बव्हंशी स्त्रिया आहेत!! खरंतर आपली किडनी कशी बिघडते, हा संशोधनाचाच विषय आहे. त्यामानाने मी सुदैवी नव्हे का? आयुष्याचे जरी सगळे उपभोग भोगले नसले तरी आयुष्याकडे त्रयस्थपणे बघण्याची संधी मला मिळाली. माझे डायलिसिस मागील वर्षी सुरु झाले म्हणजे साठी होऊन गेल्यावर. तोपर्यंतचे आयुष्य मला उपभोगायला मिळाले, हा नियतीने दिलेला प्रसाद म्हणायचं का? डायलिसिस अटळ आहे, हे ठरल्यावर मी माझा दिनक्रम बदलला.त्यातून मला पहाटेची बॅच मिळाल्यावर, आपला दिवसाचा कार्यक्रम कसा आखायचा? हे ठरवून टाकले. अर्थात बाहेर पडायची सोय नाही. त्यामुळे घरातल्याघरात काय करता येईल, याचा विचार केला. मध्यंतरी वाचन फारच कमी झाले होते, विशेषतः कविता वाचन पूर्णपणे थंडावले होते. त्या पुस्तकांकडे नजर वळवली. शरीरात फारशी ताकद नाही त्यामुळे कवितासंग्रह हातात घेऊन वाचणे, सहज शक्य होते. ४ तास डायलिसिस म्हटल्यावर एक ठरवून टाकले. घरून निघताना, मोबाईल पूर्ण चार्ज करून घ्यायचा. एकदा ती उपाचार पद्धती सुरु झाली की तुम्ही पलंगाला जखडलेले असतात. जरा हालचाल करायला वाव नसतो. मग, मी मोबाईलवर गाणी लावायला सुरवात केली. सुदैवाने माझ्या फोनमध्ये, सर्व प्रकारचे संगीत आहे, अगदी पाश्चात्य कलाकार देखील!! परिणामी, सलग ४ तास संगीत ऐकायला सुरवात झाली आणि वेळ कधी संपायला लागला, हेच फारसे लक्षात येत नाही. किंबहुना, लताबाई, आशाबाई किंवा व्हिटने ह्यूस्टन तसेच सेलीन डियॉन, यांची गायकी मला अधिक चांगली समजायला लागली. आजूबाजूचे रुग्ण देखील खुश!! हॉस्पिटलमध्ये बहुदा गाणी लावणारा, मीच एकमेव रुग्ण असावा. अर्थात आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे असते. सगळेच रुग्ण काही तुमच्या प्रकृतीसारखे नसतात. अर्थात सगळेच काही व्यवस्थित झाले नाही. मध्यंतरी डायलिसिस चालू असताना, अचानक दोन्ही तळपायातून पेटगे यायला लागले. अनिल अत्यवस्थ!! कला तर अशा जोरदार यायच्या की डोळ्यांतून पाणी यायचे. साठी पार केली म्हणजे काही फार मोठे दिवे लावले नाहीत, हे दाखवून देणारे हे क्षण. परिचारिकेला बोलावण्याइतकी ताकद नसायची. मग उजव्या हाताच्या बोटांच्या खुणा सुरु केल्या आणि त्यांना कसेबसे सांगितले. लगेच डॉक्टरला बोलावले आणि डायलिसिस चक्क थांबवले!! संपूर्ण विभाग एयर कंडिशन्ड होता तरी अंगातील टी शर्ट घामाने ओला झाला. शेवटी नेफ्रोलॉजिस्टची भेट घेतली आणि काही दिवस इंजेक्शन घ्यायला लागले. मनावर फारच दडपण यायला लागले होते. चार लोकांच्या समोर आपले दुखणे उघडे पडणे, यासारखी शरमेची गोष्ट नाही. एकदा तर युरीनची कळ लागली, बरे पलंगावरून उठणे अशक्य!! मग तिथल्या मामाला बोलावणे पाठवले आणि त्याने प्लास्टिकचे भांडे आणले आणि कळ कमी केली. तेंव्हा पासून एक काळजी घ्यायला लागलो, पहाटे घरातून बाहेर पडण्याआधी, सकाळचे सगळे विधी व्यवस्थित पार केल्यानंतरच घर सोडायचे. डायलिसिस करताना, रुग्णांना नाश्ता मिळतो (दुपारच्या रुग्णांना जेवण मिळते) परंतु नाश्ता झाल्यावर पाणी मिळत नाही. याची सवय करून घ्यायला थोडा त्रास पडतो कारण, डायलिसिस करताना, रक्त आणि पाणी वेगळे केले जाते आणि तसे चालू असताना, शरीरात पाणी भरणे, चुकीचे!! मध्यंतरी माझ्या छातीत दुखायला लागले, इतके की रात्री झोप यायची बंद झाली. जरा पलंगावर आडवे झाली छातीत कळा सुरु, पहाटे कधीतरी ग्लानी यायची आणि आपसूक डोळे मिटायचे. याचा, ज्या दिवशी डायलिसिस असेल तेंव्हा फारच त्रास व्हायला लागले. शेवटी डॉक्टर गाठला. सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या आणि छातीत २ ब्लॉक आहेत, हे निदान झाले. अँजिओप्लास्टी हाच उपाय असल्याचे निदान झाले. अर्थात पुण्याहून आदित्यआणि नेहा, तडक घरी आले. वास्तविक अँजिओप्लास्टी फार वेदनादायक नसते (या शरीराने आतापर्यंत इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता साधे इंजेक्शन घ्यायचे तर काहीच वाटत नाही) पण २ दिवस "आयसीयू" मध्ये राहावे लागते. आता आयसीयू म्हणजे बाहेरच्या जगाशी संपर्क शून्य!! तरीही ते सगळे पचवले. वास्तविक मला उपचार सुरु करून फक्त ९(च) महिने झालेत, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, इच्छा आज नेहमीप्रमाणे बॉंबे हॉस्पिटलमध्ये पहाटे ५.३० वाजता डायलिसिस करायला गेलो. गेले काही महिने मी पहाटेच जातो.त्यात मोठा फायदा, दोन्ही वेळेस घरचे जेवण मिळायला लागले. दुसरा फायदा, सगळं दिवस तुम्ही सजगपणे घालवू शकता. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे, डायलिसिसची सायकल (४ तासाची सायकल असते) संपली की तुम्हाला मशीनपासून वेगे केले जाते आणि हाताच्या शिरांवर घुसलेल्या (अर्थ शब्दाश: घ्यावा) सुया बाहेर काढून तिथे गॉज कॉटनचे बँडेज बांधले जाते. हे बँडेज अंगावर कमीतकमी ४ तास बाळगावे लागते. पूर्वी सुरवातीला मी दुपारच्या ३ वाजताच्या बॅचमध्ये जात होतो. आता दुपारी ३ वाजता सुरु होणार म्हणजे संपायला संध्याकाळचे ७ व्हायचे. त्यापुढे हातावर भलेमोठे बँडेज बाळगायचे!! परिणामी रात्रीची झोप कमी झाली आणि मानसिक त्रास व्हायचा तो वेगळाच. आता मी या सगळ्या उपचारांना सरावलो आहे. मला सुरवातीचे दिवस आठवले कारण आज माझ्या हातात रक्ताची मोठी गुठळी झाली. डायलिसिस चालू असताना, असे काही होणे, भयंकर त्रासदायक असते. वास्तविक वेदना होत नाहीत पण हातातून रक्ताची धार लागली आहे, हे दृश्य काही सुखावह नव्हतेच. मी झोपलेला बेड रक्ताने भिजायला लागला आणि मी परिचारिकेला हाक मारली आणि रक्त गालात असल्याचे दाखवले. तिने लगोलग डॉक्टरला बोलावले आणि ४,५ मिनिटे मशीन बंद करून, तो क्लॉट काढून जागा स्वच्छ केली आणि पुनश्च डायलिसिस सुरु झाले. वास्तविक डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णाला अनुभवाला अधूनमधून सामोरे जावे लागत असते. फक माझी मानसिक तयारी नव्हती. आज घरी आलो आणि गेले ९ महिने डोळ्यांसमोर आले. १ मे २०२२ रोजी माझी डायलिसिस ट्रीटमेंट सुरु झाली. सुरवातीला माझा समाज असा होता, फार तर ५,६ सायकल्स संपल्या की मी पूर्ववत आयुष्य जगायला सुरु करिन पण प्रत्यक्षात, आत आयुष्यभर करायला लागणार, ही वस्तुस्थिती लवकरच ध्यानात आली. म्हटले तर हा मानसिक धक्काच होता पण मीच मला समजावले. सुरवातीला माझे शरीर तितकेसे तयार नव्हते, हे आता लक्षात आले कारण सुरवातीच्या २,३ सायकल्स पूर्ण करून घरी आलॊ आणि जेवणानंतर थाळी धुवायला खुर्चीवरून उठलो आणि माझा तोल जाऊन, मी जमिनीवर बसकण मारली. हा अनुभव मलाच अवाक करणारा होता, हे असे होईल, अशी पहिल्या अनुभवापर्यंत तरी कल्पना केली नव्हती. पुढील २ महिन्यानंतरच्या सायकलच्या वेळी तर, मी पहाटेच्या बॅचला जायला लागलो. अशाच एका प्रसंगी, जेवण झाले आणि पुन्हा खुर्चीत बसायला पाऊल टाकले आणि माझा तोल गेला!! नशिबाने घरात त्यावेळी धुणी,भांडी करणारा गडी काम करीत होता आणि त्याला मोठा आवाज ऐकायला मिळाला. त्याने, मी जमिनीवर पडल्याचे बघताच, मला आधार देऊन, पलंगावर झोपवले आणि अंगावर चादर टाकली. मी लगोलग झोपेच्या आधीन झालो. असे अनुभव फार नाही पण ४ वेळा आले पण पुढे मलाच कळले, अशा वेळेस स्वतःला कसे सावरून घ्यायचे. यात एक गोम अशी आहे, डायलिसिस पूर्ण होते तेंव्हा तुमचे कमीतकमी १.५० ते २ किलो वजन कमी होते आणि हे शरीराला झेपणे अवघड जाते. पुढे मनाची सवय करून घेतली. आज तर मी डायलिसिस करून आलो आहे आणि हा लेख लिहायला बसलो आहे!! गेल्या १० महिन्यात माझे ७४ किलो वजन, आज ६२ किलो इतके उतरले आहे. याचा परिणाम शरीरावर होणारच होता, फक्त मी अनभिज्ञ होतो, इतकेच. आता हा सगळं खेळ माझ्या आकलनात आला आहे आणि आता यातून सुटका सहजासहजी होणार नाही, हे समजले आहे. एक तर डायलिसिस हा उपचार नसून,बिघडलेल्या किडनी फंक्शन्स सुरळीत केली जातात. किडनी बिघडली म्हणजे एकाच उपाय हाती असतो, शरीरात नवीन किडनी बसवणे. अर्थात खर्चाचा भाग बाजूला ठेवला तरी शरीरात नवीन किडनी बसवणे आणि आपल्या शरीराने मेनी करणे, ही प्रक्रिया अतोनात किचकट आहे आणि यश मिळेलच याचीखात्री कुणीही देत नाही, कारण आपल्या शरीरातील चलनवलन अचूकपणे आजही शास्त्राला यश मिळालेले नाही. आज बॉंबे हॉस्पिटलमध्ये १३ आणि १४वा मजला फक्त डायलिसिस साठी राखून ठेवलेला आहे. थोडक्यात सकाळी ७ वाजता पहिली बॅच सुरु होते, पुढील बॅच ११ वाजताची आणि शेवटची बॅच दुपारी ३ वाजता असते आणि कुठल्याही बॅचमध्ये एखादा पलंग रिकामा आहे, असे अजिबात घडत नाही!! त्यामुळे समजा तुम्ही, तुमची वेळ चुकवली तर हॉस्पिटल घरी फोन करतात आणि का आला नाहीत, याची चौकशी करतात आणि त्या रुग्णाला दुसऱ्या वेळी सामावून घेणे फार जिकिरीचे असते, एकदा मला हा अनुभव आला होता. खरंतर इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक बाब ठामपणे माहीत असते आणि ती म्हणजे हळूहळू आपण मृत्यूच्या दरवाजात जात आहोत!! हे लिहू/बोलू नये पण हे परखड वास्तव आहे. मला इथे २,३ रुग्ण भेटले होते आणि त्यांनी माझ्याशी बोलून दाखवले होते. इथे सगळे मनातल्या मनात झुरत असतात. अगदी मी देखील, जरी मी वरकरणी दाखवत नसलो तरी. जसे वय वाढत जाते, तशी डायलिसिसची उपयुक्तता कमी होते आणि अटळ परिणामांना सामोरे जावेच लागते. दुसरा तरुणोपाय नसतो. इथे काही रुग्णांच्या समवेत त्यांचे नातेवाईक येतात आणि त्यांचे चेहरे निरखणे, हा आणखी भोग असतो. वरकरणी सगळे हसत असतात आणि चेंडूला पाण्यात दाबून ठेवण्यासारखा असफल खेळ असतो. कुणीही काहीही बोलत नसते कारण प्रत्येकाला याचा शेवटकाय आहे, याची पूर्ण कल्पना असते. इथेच मला काही रुग्ण गेली १८ वर्षे डायलिसिस घेत असल्याचे समजले. ऐकले आणि मी थक्क झालो. त्याचे वय माझ्याच आसपास आहे म्हणजे अर्धे आयुष्य हॉस्पिटलच्या बेडवर गेले. कुठली दुर्दम्य इच्छाशक्ती, त्यांनी आजमितीस धरून ठेवली आहे? प्रश्नच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे येणाऱ्या रुग्णात बव्हंशी स्त्रिया आहेत!! खरंतर आपली किडनी कशी बिघडते, हा संशोधनाचाच विषय आहे. त्यामानाने मी सुदैवी नव्हे का? आयुष्याचे जरी सगळे उपभोग भोगले नसले तरी आयुष्याकडे त्रयस्थपणे बघण्याची संधी मला मिळाली. माझे डायलिसिस मागील वर्षी सुरु झाले म्हणजे साठी होऊन गेल्यावर. तोपर्यंतचे आयुष्य मला उपभोगायला मिळाले, हा नियतीने दिलेला प्रसाद म्हणायचं का? डायलिसिस अटळ आहे, हे ठरल्यावर मी माझा दिनक्रम बदलला.त्यातून मला पहाटेची बॅच मिळाल्यावर, आपला दिवसाचा कार्यक्रम कसा आखायचा? हे ठरवून टाकले. अर्थात बाहेर पडायची सोय नाही. त्यामुळे घरातल्याघरात काय करता येईल, याचा विचार केला. मध्यंतरी वाचन फारच कमी झाले होते, विशेषतः कविता वाचन पूर्णपणे थंडावले होते. त्या पुस्तकांकडे नजर वळवली. शरीरात फारशी ताकद नाही त्यामुळे कवितासंग्रह हातात घेऊन वाचणे, सहज शक्य होते. ४ तास डायलिसिस म्हटल्यावर एक ठरवून टाकले. घरून निघताना, मोबाईल पूर्ण चार्ज करून घ्यायचा. एकदा ती उपाचार पद्धती सुरु झाली की तुम्ही पलंगाला जखडलेले असतात. जरा हालचाल करायला वाव नसतो. मग, मी मोबाईलवर गाणी लावायला सुरवात केली. सुदैवाने माझ्या फोनमध्ये, सर्व प्रकारचे संगीत आहे, अगदी पाश्चात्य कलाकार देखील!! परिणामी, सलग ४ तास संगीत ऐकायला सुरवात झाली आणि वेळ कधी संपायला लागला, हेच फारसे लक्षात येत नाही. किंबहुना, लताबाई, आशाबाई किंवा व्हिटने ह्यूस्टन तसेच सेलीन डियॉन, यांची गायकी मला अधिक चांगली समजायला लागली. आजूबाजूचे रुग्ण देखील खुश!! हॉस्पिटलमध्ये बहुदा गाणी लावणारा, मीच एकमेव रुग्ण असावा. अर्थात आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे असते. सगळेच रुग्ण काही तुमच्या प्रकृतीसारखे नसतात. अर्थात सगळेच काही व्यवस्थित झाले नाही. मध्यंतरी डायलिसिस चालू असताना, अचानक दोन्ही तळपायातून पेटगे यायला लागले. अनिल अत्यवस्थ!! कला तर अशा जोरदार यायच्या की डोळ्यांतून पाणी यायचे. साठी पार केली म्हणजे काही फार मोठे दिवे लावले नाहीत, हे दाखवून देणारे हे क्षण. परिचारिकेला बोलावण्याइतकी ताकद नसायची. मग उजव्या हाताच्या बोटांच्या खुणा सुरु केल्या आणि त्यांना कसेबसे सांगितले. लगेच डॉक्टरला बोलावले आणि डायलिसिस चक्क थांबवले!! संपूर्ण विभाग एयर कंडिशन्ड होता तरी अंगातील टी शर्ट घामाने ओला झाला. शेवटी नेफ्रोलॉजिस्टची भेट घेतली आणि काही दिवस इंजेक्शन घ्यायला लागले. मनावर फारच दडपण यायला लागले होते. चार लोकांच्या समोर आपले दुखणे उघडे पडणे, यासारखी शरमेची गोष्ट नाही. एकदा तर युरीनची कळ लागली, बरे पलंगावरून उठणे अशक्य!! मग तिथल्या मामाला बोलावणे पाठवले आणि त्याने प्लास्टिकचे भांडे आणले आणि कळ कमी केली. तेंव्हा पासून एक काळजी घ्यायला लागलो, पहाटे घरातून बाहेर पडण्याआधी, सकाळचे सगळे विधी व्यवस्थित पार केल्यानंतरच घर सोडायचे. डायलिसिस करताना, रुग्णांना नाश्ता मिळतो (दुपारच्या रुग्णांना जेवण मिळते) परंतु नाश्ता झाल्यावर पाणी मिळत नाही. याची सवय करून घ्यायला थोडा त्रास पडतो कारण, डायलिसिस करताना, रक्त आणि पाणी वेगळे केले जाते आणि तसे चालू असताना, शरीरात पाणी भरणे, चुकीचे!! मध्यंतरी माझ्या छातीत दुखायला लागले, इतके की रात्री झोप यायची बंद झाली. जरा पलंगावर आडवे झाली छातीत कळा सुरु, पहाटे कधीतरी ग्लानी यायची आणि आपसूक डोळे मिटायचे. याचा, ज्या दिवशी डायलिसिस असेल तेंव्हा फारच त्रास व्हायला लागले. शेवटी डॉक्टर गाठला. सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या आणि छातीत २ ब्लॉक आहेत, हे निदान झाले. अँजिओप्लास्टी हाच उपाय असल्याचे निदान झाले. अर्थात पुण्याहून आदित्यआणि नेहा, तडक घरी आले. वास्तविक अँजिओप्लास्टी फार वेदनादायक नसते (या शरीराने आतापर्यंत इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता साधे इंजेक्शन घ्यायचे तर काहीच वाटत नाही) पण २ दिवस "आयसीयू" मध्ये राहावे लागते. आता आयसीयू म्हणजे बाहेरच्या जगाशी संपर्क शून्य!! तरीही ते सगळे पचवले. वास्तविक मला उपचार सुरु करून फक्त ९(च) महिने झालेत, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, इच्छा एकच आणखी काही बरेवाईट होऊ नये.

Saturday, 21 January 2023

लग जा गले

जरा बारकाईने विचार केला तर प्रत्येक संगीतकाराची एक विशिष्ट शैली असते आणि त्याच्या बहुतेक स्वररचना त्या शैलीशी सुसंगत असतात, जखडून घेतलेल्या असतात. कुठलाच संगीतकार या मर्यादेपासून सुटका करून घेऊ शकला नाही. अर्थात काही संगीतकार, आपल्या आहे त्या शैलीशी सुसंगत पण थोड्या वेगळया धाटणीच्या रचना करतात आणि ललित संगीतात आपले नाव अजरामर करून जातात. अखेर शैली म्हणजे तरी काय? संगीतकाराच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, त्याच्या बव्हंशी रचनेत, ठराविक स्वरिक वळणे, ठाशीव वाद्यमेळ तसेच ढाचा याबाबत एक कायमस्वरूपी रचना अनुस्यूत असते आणि तिथेच त्या संगीतकाराची "ओळख" तयार होते. अर्थात ठराविक स्वरिक वळणे, हा मुद्दा तर फार महत्वाचा ठरतो. आता ही वळणे, कुठल्या स्वरूपात आपल्या समोर येतील हे सांगणे कठीण. कधी एखादी हरकत असते, तर कधी संपूर्ण ओळच त्याच्या शैलीची ओळख दर्शवते. अशा वेळी, चालीतील निरनिराळे प्रयोग, वाद्यांची हाताळणी कितीही प्रत्ययकारी असली तरी काही खुणा, आपल्याला खुणावत राहतात. त्यावरूनच त्या संगीतकाराची ओळख पक्की होते. आपले आजचे गाणे - "लग जा गले" हे गाणे वरील विवेचनाला आधारभूत असे उदाहरण म्हणून मांडता येईल. आता ते कसे? याच प्रश्नाचा वेध घेत, या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. राजा मेहदी अली खान यांनी हे गाणे लिहिले आहे. मुळातील उर्दू रचनाकार पण हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक, ज्यांना "यादगार" असे म्हणता येईल. अशी गाणी लिहिली आहेत. विशेष करून संगीतकार मदन मोहन यांच्या सोबत त्यांची नाळ जुळली होती. चित्रपटात प्रसंगात एकसाचीपणा किंवा तोचतोचपणा येणे, क्रमप्राप्तच असते. हे अटळ वास्तव स्वीकारून, काही कवींनी अतिशय दर्जेदार कविता सादर केल्या, त्यात राजा मेहदी अली खान यांचे नाव अग्रक्रमाने येते. सांख्यिकी दृष्टीने, या कवीने भारंभार सिनेमात गाणी लिहिली नाहीत आणि म्हणून असे असू शकेल, त्यांच्या काव्यात शिळपटपणा फारसा आढळत नाही. मी नेहमी शक्यतो चित्रपट गीताचा विचार हा, केवळ "गीत" या आधारे करतो, तिथे मग पडद्यावर कसे सादर केले जाते, वगैरे बाबींचा फारसा विचार करत नाही. तेंव्हा एक गीत म्हणून बघायला गेल्यास, कवितेत फारशी आतषबाजी आढळत नाही. अर्थात आतषबाजी हेच कवितेचे बलस्थान, असे अजिबात सुचवायचे नाही परंतु बहुतेकवेळा उर्दू रचनांत आतषबाजी भरपूर वाचायला मिळते आणि त्या अनुराधाने, हे विधान केले आहे. तसे पाहिल्यास रचनेत, फारसे उर्दू शब्द देखील वाचायला मिळत नाहीत. "जार जार" हा काहीसा अनवट शब्द अखेरच्या कडव्यात वाचायला मिळतो. "जार" म्हणजे "किलकिले"!! या ओळीत या शब्दाची द्विरुक्ती ही केवळ आधीच्या ओळीतील "बार बार" या शब्दाशी यमक जुळवण्याची चलाखी आहे. अन्यथा द्विरुक्तीचे काही खास कारण संभवत नाही. एकूणच रचनेत, नायिकेच्या प्रणयी भावनेची पखरण व्यवस्थितपणे मांडली गेली आहे. "आँखों से फिर ये प्यार की बरसात हो ना हो" ही ओळ मात्र असंख्यवेळा, असंख्य विभ्रमातून व्यक्त झालेली आहे. संगीतकार मदन मोहन यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. या लेखाच्या सुरवातीला केलेले विवेचन आता विस्तारित स्वरूपात मांडता येईल. "पहाडी" या लोकप्रिय रागाधारित स्वररचना आहे. "पहाडी" राग हा लोकसंगीताच्या साहचर्याने शास्त्रीय संगीतात स्थिरावला आहे. "औडव/संपूर्ण" जातीचा राग आहे म्हणजेच आरोही सप्तकात, "मध्यम" आणि "निषाद" स्वरांना स्थान नाही. "सा ध प ध म ग प" अशा स्वरांना बांधून घेऊन, या रागाचे चलन सिद्ध होते. "रे नि धनि नि धनिनि नि प सा नि " या स्वरांनी "लग जा गले ये रात हो ना हो" या ओळीचे स्वरलेखन करता येते. आता इथे एक बाब उघड आहे, गाण्याची सुरवात "अवरोही" स्वरांनी केली आहे. परंतु या स्वरांच्या चलनातून "पहाडी" राग डोळ्यासमोर उभा राहतो. हे झाले थोडे तांत्रिक विवरण. गाण्यात तालवाद्य म्हणून "गिटार" आहे आणि त्यामुळेच लयीला गाणे काहीसे अवघड झाले आहे. एकूणच मदन मोहन या संगीतकाराची शैली बघता, हे गाणे त्याच्या नेहमीच्या पठडीतले अजिबात नाही. तरीही गाणे बांधताना, विशेषतः "हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से" या पहिल्या अंतऱ्याच्या ओळीतून आपल्याला चिरपरिचित मदन मोहन शैली ऐकायला मिळते. मी वर जे विधान केले त्याला पूरक म्हणून हे उदाहरण देता येईल. इथे "गझलकार" संगीतकार दिसत नसून, "गीत" बांधणारा संगीतकार, समोर येतो. संगीतकार म्हणून विचार करताना काही मुद्दे लगेच ध्यानात येतात. हा संगीतकार, "गीत" धर्म जाणणारा संगीतकार होता. आपण जे गाणे बनवत आहोत, ते "गीत" या शब्दासाठी बनवत आहोत, ही जाणीव त्यांच्या स्वररचनेतून नेहमी दृग्गोचर होते. परिणामी लयबंधापेक्षा गीताच्या सुरावटीकडे मदन मोहन यांचे लक्ष अधिक होते. इथे या गाण्यातून हेच वैशिष्ट्य समोर येते. जेंव्हा संगीतकार गीत उभे करतो तेंव्हा तिथे गीताच्या सांगीत विस्तारावर मर्यादा घालणे अपरिहार्य होते आणि हेच कारण मदन मोहन, गझलेकडे वळले असावेत, असे संभवते. आणि आता लताबाई.... काहीशी गूढ वाटणारी रचना गाताना, लताबाई नेहमीच सुंदर गायकी पेश करतात. "शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो" ही मुखड्यातील दुसरी ओळ गाताना, "मुलाकात हो ना हो" इथे अचानक स्वर वरच्या पट्टीत जातात. अशाप्रकारे गेल्यावर असे सूर पेलणे, ही लताबाईंची खासियत आहे आणि इथे गायिका म्हणून फार वेगळ्या होतात. असे अचानक वरच्या पट्टीत जाऊन, पुन्हा क्षणार्धात मुखड्याच्याच पहिल्या ओळीशी नाते जुळवणे,ही गळ्याची अनन्यसाधारण परीक्षा होय. "मुलाकात" शब्दावरील "रिषभ" स्वराची जोड खरोखरच जीवघेणी आहे. तसेच पहिला अंतरा सुरु करताना, पहिली २ अक्षरे साध्य पट्टीत घेतली आहेत तर लगोलग तिसऱ्या अक्षरापासून रचना वरच्या पट्टीत जाते. पुन्हा एकदा गळ्याची परीक्षा. असे स्वरांचे अवगाहन करण्यासाठी, कलाकाराच्या तयारीची ताकद ध्यानात येते. हे लिहायला फार सहज आणि सोपे आहे पण प्रत्यक्ष गेल्यावर पेलून दाखवणे, निरतिशय कठीण आहे. गायन विलक्षण गोड आहे परंतु गायला अतिशय अवघड आहे. असे असून देखील हे गाणे आजही अतिशय लोकप्रिय आहे. अर्थात मदन मोहन यांच्या सांगीतिक कारकिर्दीला किती हातभार लागला, हे प्रश्न उरतोच. लग जा गले के फिर ये हसीं रात हो ना हो शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से जी भर के देख लीजिये हमको करीब से फिर आप के नसीब में ये बात हो ना हो पास आइये के हम नहीं आयेंगे बार बार बाहें गले में डाल के हम रो ले जार जार आँखों से फिर ये प्यार की बरसात हो ना हो (3) Lag Jaa Gale - Sadhana, Lata Mangeshkar, Woh Kaun Thi Romantic Song - YouTube

जन पळभर म्हणतील हाय हाय!!

मराठी भाषा एका दृष्टीने भाग्यवान म्हणायला लागेल आणि त्यात कविता या माध्यमाचा फार मोठा वाटा आहे. अर्थातच तद्नुषंगाने बोलायचे झाल्यास, २० व्या शतकात अमाप लोकप्रिय झालेल्या "भावगीत" संगीतप्रकारात कवितेचे प्रतिबिंब पडणे सहजशक्य असेच झाले. सुदैवाने मराठी भावगीताला देखील सक्षम कवितांची नेहमीच साथ लाभली. किंबहुना असे म्हणता येईल, अनेक संगीतरचनाकारांनी अशा अनेक कविता शोधून काढल्या ज्यांना चाली लावणे, त्यांच्या पिंडाला भावले. उत्तम कविता अधिकाधिक लोकांसमोर आणण्यात, या संगीतकारांचा फार मोठा वाटा आहे, हे नि:शंकपणे कबुल करावेच लागेल. याचाच दुसरा भाग असा म्हणता येईल, निरनिराळ्या प्रकृतींच्या कवींनी आपल्या सृजनक्षम निर्मितीने मराठी भावगीत फार श्रीमंत केले. हाच मुद्दा आणखी पुढे मांडायचा झाल्यास, भावगीतांच्या कवितेत "भावकविता" अंतर्भूत करणे, हेच या कवींनी फार मोठ्या प्रमाणावर केले आणि तद्वतच रसिकांची अभिरुची वाढवण्याचे कार्य केले. खरतर कविता, विशेषतः भावकविता कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो. अनुभवाच्या पातळीवर आलेला कालावकाश तसाच्या तसा जागृत करून त्यातून जीवनाची नवीन अनुभूती देण्याचा सतत प्रयत्न करणे, एका बाजूला गतकालातील जमा झालेल्या सार्थ स्मृती (जो आपल्याला भावलेला क्षण आहे) आणि दुसऱ्या बाजूला अटळपणे अनंताकडे जाणारे हेतुशून्य भविष्य, या दोहोंतील कालाच्या पोकळीला शब्दांकित करणे, हे कविता या माध्यमाचे खरे सशक्त रूप. थोडक्यात मांडायचे झाल्यास, भावकवितेतील केवळ शब्दच नव्हे तर अक्षर देखील असे असायला हवे जिथे प्रतिशब्द/प्रतिअक्षर याला कसलाच वाव मिळू नये आणि इथे मराठी भावगीताला भा.रा. तांब्यांची कविता सापडली. कालानुरूप विचार केला तर आज, तांब्यांच्या कवितेत काही गुण तर काही दोष सापडतात परंतु जर का "गेयता" हा दृष्टिकोन ठेवला तर तिथे मराठीत अशी प्रासादात्मक कविता विरळाच आढळते. बोरकर, पाडगावकर अशी काही सन्माननीय नावे घेता येतील. इंदोरच्या सरंजामी वातावरणाचा तसेच संस्कृत भाषेचा विशेष प्रभाव पडलेला दिसतो. तरीदेखील कवितेच्या ओळींमधील लय आणि रचनाकौशल्य केवळ अप्रतिम असेच म्हणायला हवे. "जन पळभर म्हणतील हाय, हाय; मी जाता राहील काय,काय?" सुरवातीलाच एक विषण्ण करणारा प्रश्न टाकून कवितेच्या आशयाची कल्पना दिली आहे. खरतर हे एक चिरंतन सत्य आहे पण तरीही फारसे कुणीही स्वीकारत नाही, असा विरोधाभास देखील आहे. पुढे "अशा जगास्तव काय कुढावे" या ओळीने तर एक चिरंतन सत्य मांडले आहे आणि कविता फार वेगळ्याच स्तरावर गेली. संगीतरचनेबाबत मांडायचे झाल्यास, वसंत प्रभूंची चाल आहे. मराठी भावगीत जितके म्हणून श्रीमंत आणि सर्जनशील करता येईल, त्या सगळ्या शक्यता वसंत प्रभूंच्या रचनांमधून अनुभवता येतात. थोडा बारकाईने विचार केला तर गाण्याची स्वररचना "मल्हार" रागावर आहे आणि हे सहजपणे ध्यानात येत नाही. स्वररचनेकडे बारकाईने ऐकायला गेल्यावरच, "मल्हार" रागाचे काही "वळण" सापडते. थोडेसे चकितच होतो. या रागाचे आणि या कवितेच्या भावस्थितीचे नाते अशा प्रकारे सत्कृदर्शनी तरी भावणारे नाही तरीही चालीचे नोटेशन मांडले असतात,आपल्याला मल्हार रागाचे सूर मिळतात. संगीतकार प्रतिभाशाली असतो,तो असा. मला तरी असे वाटते, वसंत प्रभूंनी चाल लावली असणार आणि पुढे कधीतरी त्यांना मल्हार रागाशी साम्य जाणवले असणार. अन्यथा सत्कृतदर्शनी तरी गाण्याची चाल वेगळी वाटते. शब्दातील विखारी भावनेशी तद्रूप होऊन बांधलेली चाल, मुखड्यातच मनात शिरते. गाण्याचे शब्दच इतके प्रत्ययकारी आहेत की तिथे वाद्यमेळाच्या आधाराची फारशी गरज भासू नये आणि प्रभूंनी नेमके तेच केले आहे. म्हटले तर सरळसोट चाल आहे पण तरीही लताबाईंनी गाताना, अर्ध्या हरकतींनी गोडवा आणला आहे. वसंत प्रभूंनी चाल बांधताना, त्याचे कविता वाचन होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली आहे. "मेघ वर्षतील, शेते पिकतील; गर्वाने या नद्या वाहतील" हा दुसरा अंतरा घेताना, चाल किंचित वरच्या पट्टीत घेतली आहे. अर्थात शब्दातील आशय ध्यानात घेता, मघाशी लिहिल्याप्रमाणे मल्हार रागाशी नाते सांगणारे सूर सापडतात. लताबाईंची गायकी, हा खरे तर वेगळ्या निबंधाचा विषय ठरावा. शब्दांतील आर्जव, व्याकुळता, आणि हताश तसेच विखारी भाव, सुरांतून कसा मांडता येऊ शकतो,यासाठी ही गायकी, हा एक मानदंड आहे. "अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे" या ओळी मुद्दामून अभ्यास कराव्या, अशा दर्जाची गायकी आहे. सध्याचे आघाडीचे संगीतकार श्री. अशोक पत्की यांनी वसंत प्रभूंचा गौरव करताना "मेलडीचा बादशहा" असे केले आहे आणि वसंत प्रभूंची कुठलीही चाल ऐकताना याचे प्रत्यंतर आपल्याला येऊ शकते. खरतर मेलडी हा भारतीय संगीताचा प्राण आणि तिथेच वसंत प्रभूंची खासियत म्हटल्यावर गाण्याच्या चालीत गोडवा येणे क्रमप्राप्तच ठरते. लताबाईंची गायकी, मुद्दामून विस्ताराने लिहावी अशी आहे. इतकी अप्रतिम कविता हाती आल्यावर, जसे संगीतकार वसंत प्रभूंनी स्वररचनेत औचित्य सांभाळले आहे, तितकेच लताबाईंनी आपल्या गायनातून अधिक अधोरेखित केले आहे. इथे प्रत्येक शब्दावरील स्वरिक वजनाला अर्थ आहे, केवळ चालीचा भाग म्हणून वजन दिलेले नाही. मराठी भावगीत अशाच गाण्यांनी फार श्रीमंत झाले आहे. कविता एकूणच भावगीताच्या नेहमीच्या आकारमानाने मोठी आहे आणि तेच ध्यानात घेऊन, लताबाईंनी शब्दांना यथोचित न्याय दिला आहे.ओळींमधील शब्दसंख्या फार विषम आहे पण लताबाईंनी आपल्या गायकीने सगळे सामावून घेतले आहे. "सखे सोयरे डोळे पुसतिल" गाताना, स्वर किंचित हळवा आहे पण भावविवश नाही. परिणामी, भावना चिकट होत नाही. असेच आणखी एक उदाहरण बघायचे झाल्यास,"अशा जगास्तव काय कुढावे" ही ओळ मुद्दामून ऐकावी, गायिका प्रतिभाशाली असेल तर काहीशा "रोखठोक" वाटणाऱ्या ओळीतून, आशय किती संयतपणे मांडता येतो, हे ऐकावे आणि जमल्यास अभ्यास करावा. काही वेळा ललित संगीतात, शब्द हे चालींपेक्षा वरचढ असतात परंतु जेंव्हा शब्द आणि स्वर यांचा सुयोग्य मेळ होतो, तिथेच "जन पळभर म्हणतील हाय, हाय" अशा अद्वितीय गाण्याचा जन्म होतो. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय? सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल तारे अपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील, होईल काय का अंतराय? मेघ वर्षतिल, शेते पिकतिल गर्वाने या नद्या वाहतिल कुणा काळजी की न उमटतिल पुन्हा तटावर हेच पाय? सखे सोयरे डोळे पुसतिल पुन्हा आपुल्या कामीं लागतिल उठतील,बसतील पुन्हा खिदळतिल मी जाता त्यांचे काय जाय? अशा जगास्तव काय कुढावे मोही कुणाच्या का गुंतावे हरिदूतां का विन्मुख व्हावे? का जिरवू नये शांतीत काय? (2) Jan Palbhar Mhanatil Haay Haay - YouTube

Friday, 20 January 2023

जिया ना लागे मोरा

हिंदी चित्रपट संगीत आपल्या आयुष्यात अनेक संदर्भात अवतरले आहे. एका मर्यादेत विधान करायचे झाल्यास, हिंदी चित्रपट संगीत भारतातील आधुनिक आविष्कारांचा नवा अवतार म्हणण्यास प्रत्यवाय होऊ नये. याचा कारणास्तव, हिंदी चित्रपट संगीत हे वाढत्या प्रमाणात अभ्यास विषय होणे गरजेचे ठरते. हिंदी चित्रपट संगीताचे आकलन होण्यासाठी,सर्वात प्रथम, ज्या "जनसंगीत" कोटींत या संगीताचा अंतर्भाव होतो तिचे आकलन होणे गरजेचे आहे. मुळात जी "जनसंस्कृती" म्हणून जे अस्तित्वात आहे, त्याचाच उपप्रकार म्हणजे जनकोटी संगीत असे ढोबळ मानाने म्हणता येईल. या बाबत असे विधान करता येईल, जनकोटी संगीतात, ध्वनी या माध्यमातील अत्यंत महत्वाच्या परिमाणाची म्हणजे "स्वन" किंवा "ध्वनिवैशिष्ट्याची" विपुल आणि जाणीवपूर्वक वापरलेली विविधता!! हेच जनकोटी संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य मानता येते. आणि यालाच अनुसरून पुढे हेच वैशिष्ट्य चित्रपट संगीतात सढळपणे वावरते. याच विधानाच्या संदर्भात आपण आजचे गाणे "जिया ना लागे मोरा" आस्वादायला घेऊया. वास्तविक पाहता मजरुह सुलतानपुरी हे नाव केवळ उर्दू भाषेत नसून, अखंड हिंदी चित्रपटसृष्टीत अतिशय आदराने घेतले जाते आणि ते सर्वार्थाने सत्य आहे. गेयताप्रधान गीते लिहिताना, भाषेचा अनुपम डौल, त्यांच्या रचनेतून वाचायला मिळतो. कविता समजायला फारशी अवघड नसते तरीही कवितेत घीसेपीटेपण फारसे नसते. लिखाणात प्रचंड सातत्य असून देखील भाषिक दर्जा टिकवण्यात कमालीचे यश प्राप्त केले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील मोजक्या दर्जेदार कवींमध्ये त्यांची गणना होते. आजचे गाणे हे बरेचसे "बंदीश" प्रधान गाणे आहे. अर्थात ज्याप्रमाणे रागदारी संगीतातील बंदिश रचनेला, काव्यदृष्ट्या फार महत्व नसते. अगदी तास प्रकार इथे घडविलेला नाही पण, एक घाटदार बंदिश असावी, त्याप्रमाणे एकूण रचनेचा घाट आहे. नायिकेचा नायकाला उद्देशून केलेला आत्मगत संवाद आहे. त्यामुळे एकूणच भाषा देखील काहीशी सांकेतिक आहे. "काहे पट खोला,तूने मेरे द्वार का; आया बरसों में कोई,झोंका प्यार का" सारख्या ओळीतून हे स्पष्ट वाचायला मिळते. "दो पल तो ठहर जा,मोहे इतना भी ना सता" या ओळीतून नायिकेला वाटणारा विश्वास प्रतीत होतो. असे जरी असले तरी एकूणच कविता म्हणून वाचताना, फार काही हाताला लागत नाही, हे खरे. अर्थात अशी अपेक्षा ठेवायचे कारण स्वतः मजरुह यांचे स्थान आहे. इतर कोणी कवींच्या बाबतीत अशी अपेक्षा ठेवणे, अपवाद स्वरूपात का होईना, जड जाते. इथे कवितेची खुमारी जाणवते ती, चालीच्या गुंतागुंतीतून, थोडक्यात चालीमध्ये जे "खटके" किंवा "हरकती" आहेत,, त्याला "सुयोग्य" अशी शब्दरचना आहे आणि तशी लिहिली गेली, हेच या कवितेचे मुख्य यश म्हणावे लागेल. संगीतकार राहुल देव बर्मन यांनी बांधलेली "तर्ज" हेच या गाण्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल. स्वररचना सरळ,सरळ "खमाज" रागावर आधारित आहे. खमाज राग एकूणच ललित आणि उपशास्त्रीय रचनांसाठी खूप लोकप्रिय राग आहे. "रिषभ" वर्जित हा राग "शाड्व / संपूर्ण" या जातीचा आहे. तसा अगदी सरळसोट राग आहे. "ग म प ध नि(को) ध" ही सुरावट "ना जा रे, ना जा रे, ना जा" इथे ऐकायला मिळते आणि खमाज राग सिद्ध होतो. आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, या संगीतकाराची जी ओळख निर्माण झाली आहे, त्याला छेद देणारी रचना आहे. बैठकीच्या गाण्याचा आराखडा आहे त्यामुळे फारसा वाद्यमेळ वापरलेला नाही. अत्यंत घरगुती वातावरणातील गाणे आहे. वाद्यमेळात सतार,बासरी ऐकायला मिळते परंतु सगळे गाणे तालाच्या मात्रांवर उचलून घेतले आहे. गाण्यात तालाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग करण्याच्या कौशल्याला मात्र दाद द्यायला हवी. गाणे मध्यलयीत आहे पण अंतरा संपताना किंचित्काल द्रुत लयीत शिरते परंतु ते शिरणे, हा स्वररचनेचा आंगिक भाग आहे. आपल्या भारतीय संगीतात, समेच्या मात्राला अतिशय महत्व आहे आणि त्या मात्रेला रचना येताना, लय विसर्जित होते आई हे विसर्जित होणे, अतिशय डौलाने होणे, अपेक्षित असते. या विधानाचा थोडा बारकाईने विचार केल्यास, इथली द्रुत लय का निम्नस्तरावर आहे, याचा उलगडा होतो. या गाण्यातील "विराम" अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत, "जिया ना" नंतर छोटासा विराम आहे, पण निव्वळ अप्रतिम आहे. तसेच पुढे "दो पल तो ठहर जा" इथे असाच जीवघेणा विराम आहे. शब्दांचे औचित्य राखून निर्माण केलेली "जागा" आहे. प्रेयसीची आळवणी "ठहर जा" या शब्दातून व्यक्त होते तेंव्हा तिथेच क्षणभर सगळेच थांबणे औचित्यपूर्ण ठरते. गाणे ऐकताना, या संगीतकाराच्या शैलीची सगळी वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात, जसे की "खटके" घेण्याची पद्धत किंवा "हरकत" घेताना, काहीसा तुटकपणा घ्यायचा! अर्थात हे लताबाईंच्या गायकीचे कौशल्य देखील म्हणता येईल. लताबाईंची गायकी अशा गाण्यातून खुलून येते. इथे प्रत्येक शब्दाचा उच्चार ऐकण्यासारखा आहे, जसे की अस्ताई मधील "जिया ना लागे मोरा" गाताना, स्वरांचे ताण तर सांभाळले आहेतच परंतु शब्दांमधील भाव देखील त्याच असोशीने दाखवला आहे. प्रियकराची ओढ इतक्या सौंदर्यपूर्णतेने ऐकवली आहे की तिथेच हे गाणे आपल्या मनाची पकड घेते. "ना जा रे, ना जा रे, ना जा" इथे अक्षरांचे पुनरावर्तन जरी असले तरी प्रत्येक अक्षराचे ठळक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य, लताबाईंनी आपल्या गळ्यातून दाखवले आहे. गाण्यातील प्रत्येक खटका, त्या शब्दांतील दडलेला आशय स्पष्ट करणारा आहे. "गायकी" दाखवण्याचा चुकूनही प्रयास नाही.मुळात चाल इतकी गोड आहे की मुद्दामून शब्दांवर सुरांचे वजन टाकण्याची गरज नाही. लताबाईंनी हेच गाऊन सिद्ध केले आहे. मुळात गाण्यातील "मेलडी" इतकी सुंदर आहे की त्याला बाह्य आवरणाची गरजच भासत नाही. अतिशय शांत, निर्मळ आणि गोड गाणे आहे. रसिकांनी खरोखरच दाद द्यावी, असे हे गाणे आहे. जिया ना लागे मोरा, ना जा रे, ना जा रे, ना जा काहे पट खोला,तूने मेरे द्वार का आया बरसों में कोई,झोंका प्यार का दो पल तो ठहर जा,मोहे इतना भी ना सता सुन के मेरी बातें, पलक तेरी क्यूँ झुकी अच्छा रे बेदर्दी, जा नहीं मैं रोकती ये है तेरा रस्ता, कहीं जा सकता है तो जा (2) Jiya Na Lage Mora - Navin Nischal - Archana - Buddha Mil Gaya - Om Prakash - Deven Verma - YouTube

Friday, 13 January 2023

पाहिले न पाहिले

जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले, निळ्या लाघवी दंवात उलगडले, जे मोरपिसांवर सावरले, ते-त्याहूनही-आज कुठेसे पुन्हा एकदा तशाच एका लजवंतीच्या डोळ्यांमध्ये-डोळ्यांपाशी - झनन-झांजरे मी पहिले..... पाहिले न पाहिले..... ते प्राजक्ताच्या पाकळीवर उतरले, मदिरेवरच्या निळ्या गुलाबी फेसावर महिरपले, जे जललहरीवर थरथरले, ते-त्याहून-आज कुठेसे पुन्हा एकदा तशाच एका लजवंतीच्या ओठांवरती-ओठांपाशी- ठिबक-ठाकडे मी पाहिले पाहिले न पाहिले. जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले सोनेरी निळसर मळ्या-मळ्यांतून शहारले, जे पुनवेच्या चांदण्यात भिजले,भिजले. ते-त्याहूनही-आज कुठेसे पुन्हा एकदा तशाच एका लजवंतीच्या मानेखाली-किंचितवक्षी- बहर-बावरे-मी पाहिले.... पाहिले न पाहिले सर्वसाधारणपणे पु.शि. रेग्यांची कविता म्हटल्यावर मनात काही ठोकताळे तयार होतात. जरी प्रणयी कविता लिहिणारे, असा जरी समज असला तरी त्यातील विविध छटा, नेहमी थक्क करणाऱ्या असतात. स्त्री ही त्यांच्या बहुतांश कवितेचे मध्यवर्ती कल्पना असते आणि त्या कल्पनेभोवती, वेगवेगळ्या प्रतिमा खेळवत, कवितेला फुलवत मांडणी करायची, अशी त्यांची पद्धत. चराचरांच्या,निसर्गाच्या रस-गंध-रंग-नाद-स्पर्शमयी रूपांतून रसरणारे स्त्रीचे दर्शन त्यांच्या कवीमनाला भुलवत असतेच परंतु रेग्यांना या सृजनशक्तीच्या मार्दवाचा आणि सौष्ठवाचा, गूढतेचा आणि ऐश्वर्याचा खरा अनुभव मिळतो तो स्त्रीच्या मृदू,मादक शरीरलावण्यात आणि मुग्ध भावविभोर छटांमध्ये. स्त्रीच्या सौंदर्यातील संवेदनशीलतेला तेच नेहमी बहुदा बोलावत असावेत. ही सृजनशक्ती, ही जीवनोत्सुकता म्हणजेच स्त्रीचे खरे रूप. ही जाणीव त्यांच्या कवितेतून सातत्याने अनुभवायला मिळते. या अनुभवण्याच्या प्रक्रियेतून मग शांत,संतृप्त,पूर्ण, आनंदमयी अशा छटा त्यांना दिसतात. मग ती स्त्री कुठल्याही स्वरूपातील असो, तिचे सौंदर्य, हा कवी पूर्णतेने उपभोगतो की काय? असा गोड प्रश्न पडतो. मात्र स्त्री सौंदर्य उपभोगताना, त्यातील रसरशीतपणा, त्यांच्या प्रतिमांमधून अतिशय रेखीवपणे उमटतो.खरे म्हणजे सगळी कविता हाच एक अद्वितीय अनुबभव असतो, त्यात असोशी असते, शृंगार असतो, शारीरलावण्य असते. वास्तविक मराठी मनाला आजही स्त्रीच्या सौंदर्याच्या ठराविक, सांकेतिक प्रतिमांची ओढ आहे परंतु त्या पलीकडील सौंदर्य बघायला मराठी मन बुजते. जिथे मन असे बुजते, तिथे रेग्यांची कविता पुढे येते. रेगे आपल्या कवितेत बऱ्याचवेळा शब्दांची मोडतोड करतात किंवा संपूर्णपणे नव्याने घडवतात. प्रसंगी निरर्थक शब्दांतून अतिशय रेखीव असा आशय व्यक्त करतात. प्रस्तुत कवितेतील "झनन-झांजरे" किंवा " ठिबक-ठाकडे" या शब्दांना तसा रूढार्थाने काही अर्थ नाही परंतु या शब्दांची जोड रेग्यांनी अशा प्रकारे केली आहे की त्या निरर्थक वाटणाऱ्या शब्दांतून अनेक अर्थाच्या छटा दर्शविल्या जातात. ही रेग्यांची खासियत. वास्तविक पहाता, ही कविता फक्त ३ कडव्यांची आहे पण प्रत्येक कडव्यातून त्यांनी स्त्री सौंदर्याचे निरनिराळे रूप व्यक्त केले आहे आणि तसे करताना, त्यांनी शारीर सौंदर्याकचा उपयोग केला आहे. कवितेची धाटणी थोडी संस्कृत साहित्याच्या वळणाची वाटते तरीही ती वेगळी आहे. रेगे स्त्री सौंदर्य उपभोगताना, त्यातील अंत:प्रेरणांकडे आपले लक्ष वेधून घेतात. कुठल्याही कवितेत शब्दांची अपरिहार्यता जितकी जमते, तितकी ती कविता अधिक व्यापक होते. आता इथे सुरवातीलाच "जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले," या ओळीत "मत्त शब्द आहे, तो "उन्मत्त" लिहून जमला नसता. इथे हाच शब्द अत्यावश्यक. "जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले" इथे "कलहंस" हाच पक्षी हवा आणि हाच शब्द शोभतो. कवितेची धाटणी लक्षात घेता, या शब्दाने जी पूर्णता येते ती कुठल्याच शब्दाने अशक्य वाटते. "भुरभुरले" या क्रियापदाने त्या ओळीला एक भरीवपणा आला आहे. वास्तविक असे शब्द एकेकट्याने अर्थशून्य वाटू शकतात परंतु कवीची खासियत अशी की त्याच शब्दांची घडण नव्याने करताना, त्यांना पूर्ण अर्थ प्राप्त व्हावा. "जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले, निळ्या लाघवी दंवात उलगडले, जे मोरपिसांवर सावरले," पहिल्याच ओळींतून कवितेचे "घराणे" आणि "संस्कृती" स्पष्ट होते. स्त्री सौंदर्याची अशी घडण मराठी कवितेत फार तुरळकपणे वाचायला मिळते. "डोळ्यांमध्ये-डोळ्यांपाशी -" इथे डोळे शब्द साधा आहे परंतु त्या शब्दांच्या मागे-पुढे जे वर्णन आहे, त्यामुळे या शब्दांना वेगळीच झिलई प्राप्त होते. "झनन-झांजरे" या मुळातल्या शब्दांना एक "नाद" मिळतो आणि सगळीच कविता नादमय होते. "लजवंती" हे रेग्यांनी घडवलेले विशेष नाम आहे. इथेच कविता इतरांपेक्षा वेगळी होते. पुढे मग "प्राजक्त" अवतरतो पण तो पाकळीवर अवतरतो, पूर्ण फुल इथे अभिप्रेत नाही. पाकळीमध्ये जो नाजूकपणा आहे तो पूर्ण फुलामध्ये येईलच असे नाही. रेगे अशाच प्रतिमांनी कविता फुलवतात. रेग्यांच्या कवितेत व्यक्त होणारा स्त्रीचा आदिबंध हा सांस्कृतिक भावविश्वातील आदिशक्तीशी नवे नाते जोडतो. त्यांचा प्रतिमाव्यापार हा नाविन्यपूर्ण तर आहेच पण जरीही सांकेतिक नाही. तिथे पारमार्थिक काहीही नसून जे आहे ते "मानवी" आहे, "मानसिक" आहे. एक प्रकारच्या ताज्या, रसरशीत जीवनाचा आणि सोनेरीशुभ्र पार्थिव सौंदर्याचा रसिकतेने आणि मनमोकळेपणाने घेतलेला अनुभव आणि आस्वाद, असे खरे स्वरूप आहे. अनुभव घेताना रतिक्रियेच्या पलीकडील अनुभव शब्दातीत करणे, हे त्यांच्या कवितेचे मुख्य अंग मानता येईल. त्याच अनुषंगाने मग विचार करायचा झाल्यास, "जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले सोनेरी निळसर मळ्या-मळ्यांतून शहारले, जे पुनवेच्या चांदण्यात भिजले,भिजले." "मळ्या-मळ्यांतून शहारले" या शब्दांच्यापुढे वेगळी अभिव्यक्तीच संभवत नाही.सोनेरी निळसर मळे आणि त्याच्याआधी येणारे कलहंसाचे भुरभुरणे, हे सगळेच अतिशय काव्यात्म आहे आणि मुख्य म्हणजे या कवितेच्या संदर्भात अपरिहार्य आहे आणि हे तसे वाटणे,इथे भावकविता सिद्ध होते. मी वरती जो "मानसिक" शब्द वापरला तो याचा ओळींच्या संदर्भात. खरं म्हणजे कविता हाच एक सर्वांगसुंदर अनुभव असतो. हा अनुभव शब्दस्वरूप परंतु कल्पकतापूर्ण असतो. कवितेत कवीची संवेदनशीलता अभिप्रेत विषयाचा अनुभव नेहमीच कल्पकतेने घेत असतो. इथे हाच अनुभव आपल्याला अशाच प्रकारे घेता येतो. इथे प्रत्येक शब्दाला महत्व आहे आणि प्रत्येक ओळीतून अप्रतिम अशी अनुभूती वाचकाला मिळते. This is par excellence of romantic ritual.

Wednesday, 11 January 2023

मीच बुडविलें

ऐकून घेणारा...... तूं, समजून घेणारा.....तूं, तुझ्याचपाशी म्हणून वागलें, म्हणून बोललें....उगाच काहीं खुळेभाबडें, भानमोकळे.... अर्थशून्यही. मुरडून थोडे नाक बुद्धीचे, हासून थोडे उपहासाचे, म्हणालास तू.... "सांगशील का मोजून मजला या उथळपणाची खोली?" गळ्यांत आला एक अवंढा __डोहच काळा उथळपणाचा__ भिडले काळें पाणी येऊन काजळावरी.... आणि तुला मी, मीच बुडविलें त्या डोहामधीं उंच तुझ्या त्या हिमशिखरांसह. "मृगजळ" या कवितासंग्रहातील ही छोटेखानी परंतु आशयगर्भ कविता, परंतु कवियत्री इंदिरा संत यांच्या शैलीची चुणूक दाखवणारी कविता. या कवितेत इंदिरा संतांच्या कवितेची सगळी वैशिष्ट्ये वाचायला मिळतात. ही कविता "भावकविता" म्हणून निश्चितच गणली जाते. आता त्या दृष्टीने विचार करता, कुठलीही कविता ही नेहमीच्या शब्दांतून आपल्याला वेगा आशय प्रतीत करून देणारी असावी. आपल्या नेहमीच्या जाणिवांना पाहिलं खोलवर दिशा दर्शवणारी असावी. बाकी गोष्टी या नंतर अवतरतात आणि त्या सगळ्या शब्दनिष्ठ असतात. आपण जगताना असंख्य अनुभव पदरात घेत असतो पण त्या अनुभवांना नेमक्या शब्दांची जोड मिळतेच असे नसते पण काही अनुभव हे कायम स्मृतीत टिकून राहतात आणि मग अवचितपणे त्या अनुभवांना शब्दरूप मिळते. अर्थात, भूतकाळातील अनुभवांना जेंव्हा वर्तमानात शब्दरूप देण्याची वेळ येते तेंव्हा त्यावेळच्या जाणिवा आणि आजच्या जाणिवा यात अंतर पडू शकते आणि आशयाची व्याप्ती बदलू शकते. अर्थात वर्तमानात जाणीव अधिक टोकदार आणि लखलखीत होऊ शकते आणि तो अनुभव पुन्हा नव्याने झळाळून उठतो. भूतकाळाच्या संवेदना त्याच जाणिवेने पुन्हा मांडणे, इथे इंदिरा संत यांची कविता यशस्वी होते. पूर्वीची झालेली जाणीव त्याच जाणिवेने प्रतीत करण्यात बाईंची कविता खरंच श्रेष्ठ ठरते. आता या कवितेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, कविता स्पष्टपणे आत्मगत स्वरूपाची आहे आणि हे तर बाईंच्या कवितेचे नेहमीचे गमक म्हणता येईल. इंदिरा संतांच्या बहुतेक कविता याच पातळीवर वावरत असतात. परंतु त्यात एकासाचीपणा न येत, जाणिवांच्या निरनिराळ्या दिशा आपल्याला बघायला मिळतात. वास्तविक कविता हा शाब्दिक खेळच असतो परंतु त्या खेळाची व्याप्ती, तुम्ही मगदुराप्रमाणे वाढवू शकता. निरनिराळ्या प्रतिमांना वेगवेगळ्या प्रकारे खेळवत, आशय अधिकाधिक विस्तारित न्यायचा, ही त्यांनी मांडलेल्या खेळाची दुसरी बाजू, सुरवातीलाच " ऐकून घेणारा...... तूं" या ओळीतून एक अवघडलेपण दिसते आणि ते कायम संपूर्ण कवितेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून आपल्याला वाचायला मिळते. हेच अवघडलेपण पुढे "तुझ्याचपाशी म्हणून वागलें, म्हणून बोललें....उगाच काहीं खुळेभाबडें," या ओळींतून स्पष्ट दिसते. "बोललें...." नंतर जे चार ठिपके आहेत, ते काही चूष म्हणून मांडलेले नसून, पुढील "उगाच" या शब्दाचा अर्थ वाढवणारे आहेत. बोलायचे तर आहे पण कसे बोलायचे, हे अवघडलेपण मनात असल्याने, काहीशा तुटक, चाचरत भावनेतून उमटलेल्या संवेदना आहेत. म्हणूनच "खुळेभाबडे" सारखा शब्द वाचायला मिळतो. याच शब्दाने त्या ओळीचा शेवट होणे, हे अपरिहार्य असते. तिथे दुसरी अभिव्यक्ती असूच शकत नाही. नात्यातील ताणेबाणे हे असे दर्शवले आहेत. अत्यंत मोजक्या शब्दात भावना दुसऱ्याला पोहोचवायची ही इंदिराबाईंची खासियत फार वेगळी ठरते.एकमेकांच्या जवळ आहोत पण तरीही मनातले बोलायची धिटाई होत नाही. "भानमोकळे.... अर्थशून्यही." असे शब्द मोडून, दीर्घ लांबवून तीच भावना अधिक खोलपणे व्यक्त होते मन मोकळे करताना, काहीसा inferiority complex येऊन, मग " अर्थशून्य" असे वाटून, काहीशी अपराधी भावना मनात आली का? असा प्रश्न उभा राहतो. कारण समोरच्या व्यक्तीला आपली भावना नेमकेपणाने कळेल का? या प्रश्नातून आलेली ही भावना आहे. ठिपके मांडून ही भावना अधिक खोलपणे व्यक्त होते. इथेच मनातील चाचरणे दिसून येते. एव्हाना जे सांगायचे ते सांगून झाल्यावर, प्रतिक्रिया म्हणून समोरच्या व्यक्तीचे काहीसे उपहासात्मक बोलणे ऐकायला मिळते. पुरूषच तो, तेंव्हा आपला ताठा दाखवणारच!! आपली बुद्धी तसेच पुरुष असल्याचा वृथा अभिमान डोकावत असताना, "मुरडून थोडे नाक बुद्धीचे, हासून थोडे उपहासाचे, म्हणालास तू.... "सांगशील का मोजून मजला या उथळपणाची खोली?" या ओळींतून तेच तिच्या ध्यानात येते. आपल्याला हा पुरुष समजून घेईल का? आणि कानावर लगोलग "सांगशील का मोजून मजला,या उथळपणाची खोली?" असली पृच्छा येते. मनात जी अनामिक भीती दडलेली आहे, त्याचेच प्रत्यक्ष स्वरूप उभे राहते आणि एकदम मन बावचळते. कविता वाचता,वाचता एकदम वेगळे प्रतीत व्हावे असा हा अनुभव आहे. येणार अनुभव एकदम समोर उभा ठाकला की जी मनाची ओढगस्त अवस्था होते, तेच इथे वाचायला मिळते आणि संवेदन विश्व वेगळेच निर्माण होते. वास्तविक बाईंच्या कवितेत नेहमी निसर्ग असतो पण इथपर्यंत तरी त्याचा मागमूस दिसत नाही. "गळ्यांत आला एक अवंढा __डोहच काळा उथळपणाचा__ भिडले काळें पाणी येऊन काजळावरी...." इथे मात्र एक सुंदर प्रतिमा येते. "__डोहच काळा उथळपणाचा__" . नको असलेले समोर आल्यावर,आहे ते तसेच्या तसे स्वीकारण्याची तयारी नसते आणि स्वभावगत भावना डोळ्यांतून उमटते. इथे पहिल्याप्रमाणे ठिपके नसून डोहाच्या खोलीची व्याप्ती दर्शवली आहे. निसर्गप्रतिमा इथे ठसठशीतपणे पुढे येते.आता "डोह" म्हटल्यावर त्यातील "काळे पाणी" ही सहज प्रतिक्रिया होणे, स्वाभाविक होते. खरंतर सगळीच कविता ही एका स्वाभाविक मनोवस्थेची अलौकिक जाण आहे. काळे पाणी काजळावर येणे, ही या भाववृत्तीची अखेर म्हणता येईल. आता पर्यंत जे अनुभवविश्व साकारले आहे, त्याची ही अटळ अशी अखेर म्हणायची का? हा विदग्ध अनुभव खरंतर बहुतेकांच्या आयुष्यात अनेकवेळा, अनेक प्रकारे येत असतो परंतु त्याला असे शब्दरूप देणे कितीजणांना शक्य असते? काजळावर काळे पाणी साचणे, ही अभिव्यक्तीच फार मोठी आहे. संपूर्ण अनुभव वेगळ्याच स्तरावर जातो. आणि तुला मी, मीच बुडविलें त्या डोहामधीं उंच तुझ्या त्या हिमशिखरांसह. आता कवितेच्या शेवटाकडे. आलेला अनुभव तसाच्या तास पचविणे अशक्य मग हाती काय राहते? एकदा "डोह" ही प्रतिमा स्थिर केल्यावर त्या शब्दाच्या अनुरोधाने पुढील अनुभव मांडणे, अपरिहार्य ठरते, पण तो अनुभव कशाप्रकारे "रिचवला" जातो, ते बघण्यासारखे आहे. त्या व्यक्तीला, त्याच्या विचारांना स्मृतीतून नाहीसे करणे, आवश्यक वाटते तेंव्हा जो डोह आपण निर्माण केला आहे, त्या डोहातच त्या स्मृतींना गाडून टाकणे, अधिक श्रेयस्कर. अर्थात तसे करताना, पुरुषी बाणा दर्शवून गाडले आहे - "हिमशिखरांसह"! तुझा ताठा, कर्मठपणा यातून जो "थंडगार" अनुभव जाणवतो, तोच या शब्दात मांडून त्याला त्या डोहात गाडणे, हेच अखेरचे प्राक्तन असू शकते. अतिशय साधा, नेहमीच अनुभव परंतु त्याला वेगवेगळ्या प्रतिमांतून खेळवत आपल्यासमोर इंदिरा संतांनी मांडला आणि हेच त्यांच्या काव्याची खरी शैली म्हणता येईल.