लताबद्दल आत्तापर्यंत खरेतर असंख्य लेख लिहून झाले आहेत, त्यामुळे आता नवीन काय लिहायचे हा प्रश्नच आहे. इथे, मी लता – गायिका, या दृष्टीकोनातून लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. लताविषयी लेख वाचताना, काही मुद्दे माझ्या लक्षात आले. वास्तविक, हि गायिका इतकी प्रसिध्द आहे की तिला कसलेच खाजगी आयुष्य उरलेले नाही. त्यामुळे, बऱ्याचशा लेखात, लता मंगेशकर, व्यक्ती म्हणून कशी आहे, याबद्दलच लिहिलेले आढळते. उदाहरणार्थ, “लता पांढऱ्या साडीत किती सुंदर दिसते” असले वाचतानाच डोळे पांढरे करणारे वाक्य हमखास वाचायला मिळते किंवा “लता किती गोड बोलते”, “फोनवर किती सुरेख बोलते” अशी वर्णने वाचायला मिळतात!! एकदा की तुम्ही सार्वजनिक झालात की मग अशा लेखांना उदंड प्रतिसाद मिळतो. परंतु जरा विचार केला तर, या गोष्टींचा तिच्या संगीताशी काय संबंध? मुळात, लता ही गायिका म्हणून प्रसिध्द आहे, तेंव्हा त्यानुरूप लेख लिहिणे क्रमप्राप्त ठरते. असे नव्हे की तिच्या बाकीच्या गुणांची माहिती मिळू नये परंतु, गणपती आहे म्हणून मखराला शोभा आहे, याचा विसर पडतो!! कै. अशोक रानडे किंवा राजू भारतन (आणि काही अपवाद लेखक असतील!!) वगळता, तिच्या गायनाची चिकित्सा अभावानेच आढळते, किंबहुना, आपल्याकडे, सुगम संगीताकडे बघण्याचा दृष्टीकोन बव्हंशी मनोरंजनात्मक असल्याने काहीही बौद्धिक लिहिले जात नाही आणि हि फार मोठी उणीव आहे. याचा अर्थ असा नव्हे, इथे मी बरेच काही बौद्धिक लिहिणार आहे परंतु त्यादृष्टीने प्रयत्न मात्र नक्कीच करणार आहे., आणि त्याच दृष्टीने, मी, मागील २ लेखांत लताची गायकी आणि काळानुरूप घडत गेलेला बदल, याविषयी चार शब्द लिहिण्याचा प्रयत्न केला.
लता जेंव्हा चित्रपट सृष्टीत आली,तेंव्हा चित्रपट संगीतात फार मोठे मन्वंतर घडत होते, नाट्यसृष्टीला घसरण प्राप्त होत होती. असे असले तरी चित्रपट संगीतावर, पारशी आणि मराठी थियेटरचा फार मोठा प्रभाव होता आणि त्यावेळच्या रचना ऐकल्यावर, आपल्याला कल्पना करता येते. मुळात, चित्रपटात गाणे, यालाच फारशी प्रतिष्ठा नव्हती!! याला, पहिला धक्का दिला, प्रथम सैगल आणि नंतर नूरजहान,यांनी!! चित्रपट संगीतात गाण्यासाठी गायनाची जरुरी असते,याची जाणीव या दोन गायकांनी करून दिली. अर्थात, लतावर नूरजहानचा प्रभाव असणे, क्रमप्राप्तच होते. अगदी, “आयेगा आनेवाला” हे गाणे जरी विचारात घेतले तरी हा मुद्दा स्पष्ट व्हावा. लताचे खरे कर्तृत्व असे की ,ज्या गायकीची कास सुरवातीला धरली, त्या प्रभावातून, फार लवकर बाहेर पडली आणि स्वत:ची गायकी सिध्द केली!! आता, स्वत:ची गायकी म्हणजे तिने नक्की काय केले? ती गायकी कितपत “अभिजात” आहे? तिच्या गायकीचा अजूनही प्रभाव आहे म्हणजे नक्की काय आहे? अशा काही प्रश्नांतून आपण, गायकीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एक बाब तर अवश्यमेव मान्य करायलाच हवी आणि ती म्हणजे, जवळपास ५० पेक्षा अधिक वर्षे जनमानसावर अधिराज्य आणि तेदेखील अव्याहतपणे गाजविणे, ही सहज जमणारी बाब नव्हे. भारतीय संगीतात असे फार थोडे कलाकार आहेत, त्यांना, इतकी वर्षे अधिराज्य गाजवता आले आहे आणि ते देखील उत्तरोत्तर वाढत्या प्रमाणात!! चित्रपटात दृश्य, श्राव्य संवेदना आणि संविद एकत्र वावरत असतात आणि या तिन्ही घटकांना बाजूला सारणे, म्हणजे पार्श्वगायन!! इथे लताचे एक वैशिष्ट्य लगेच ध्यानात येते. लताने, गाणे गाताना, त्याला स्वत:चे असे “अंग” दिले!! थोडक्यात, आविष्काराच्या अनेक शक्यता ध्यानात घेता, वास्तववाद, प्रयोगशीलता याबाबत सांगीत सौंदर्याचा अनुनय करताना, एक वेगळी प्रणाली निर्माण केली!!
लताच्या आवाजाचा तारता-पल्ला अतिशय विस्तृत आहे. त्यामुळे लयीच्या सर्व दिशांनी तिला, चपलगती चलन सहज शक्य आहे. याचाच वेगळा अर्थ, सगळ्या सप्तकात तिचा गळा सहज फिरतो. असे असले तरी, निसर्गत: स्त्री आवाज आणि पुरुष आवाज, यांच्यात काही महत्वाचे फरक बघावे लागतील . स्त्रीचा गळा साधारणपणे पातळ असतो आणि त्यादृष्टीने, तार स्वरात स्त्रीचा गळा जितका सहज जातो तितका पुरुषी गळा जात नाही!! याचाच उलट भाग असा, पुरुषी गळ्यात “ढालेपण” नैसर्गिक असल्याने, खर्ज स्वर ज्या प्रमाणात पुरुषी गळ्यात सहज येतात, तितक्या प्रमाणात स्त्री गळा जाऊ शकत नाही!! वास्तविक पाहता, ध्वनिशास्त्र ताडून पाहिले असता असे आढळते, जर का गळ्यात “खर्ज” स्वर जितका अंतर्मुखरीत्या लावता येईल तितक्या सहजपणे “तार” स्वर सहज घेत येणे शक्य आहे. असे असले तरी, स्त्री गळ्याला “तार” स्वर जितका सहज शक्य आहे, तितका पुरुषी गळ्याला नाही, हे सर्वमान्य सत्य आहे.
आता, याच विचाराचा दुसरा अर्थ असा काढता येईल, लताच्या गळ्यातून तितका “असामान्य” खर्ज येत नाही!! मुळात स्त्री स्वर त्यातून लताचा गळा अतिशय पातळ, त्यामुळे शास्त्रानुरूप जितका “खोल” खर्ज ऐकायला मिळावयास हवा, तितका लताच्या गळ्यातून ऐकायला मिळत नाही!! इथे लताच्या गायकीचे “न्यूनत्व” दर्शवायचे नसून, निसर्गक्रम कसा असतो आणि अखेर शास्त्र नेहमीच महत्वाचे आणि कलाकार त्याच दृष्टीने न्याहाळायचा, इतकेच माझे म्हणणे आहे.
लताच्या आवाजातील आणखी प्रमुख जाणवणारे वैशिष्ट्य – प्रासादिकता!! रसिकांपर्यंत पोहोचणारे गाणे, हे नेहमी एका चाळणीतून गाळून येत असते!! त्यामुळे चाळणी काय गुणवत्तेची आहे, ते इथे महत्वाचे ठरते. याच प्रसादगुणांमुळे लताच्या आवाजातून जे गाणे ऐकायला मिळते, ते बव्हंशी अतिशय विशुध्द स्वरुपात मिळते, तिथे संगीत अपभ्रष्ट होण्याची शक्यता फार कमी आहे. संगीतकारांना याचा गुणाचा अधिक विशेष वाटत असतो. त्यांच्या ज्या रचना आहेत, त्यातील नेमकी गुणग्राहकता, लताच्या गळ्यातून तंतोतंतपणे रसिकांपर्यंत पोहोचणार, याची रचनाकारांना खात्रीच असते.
आपल्या संगीत शास्त्रात “शारीर” हे एक वैशिष्ट्य मानले आहे. सादर होणाऱ्या रचनेच्या (इथे रचना म्हणजे रागदारी तसेच सुगम संगीत, असे दोन्ही आहे!!) योग्य त्या भावनिक गाभ्याशी थेट पोहोचण्याची आवाजाची क्षमता, या गुणाने शक्य होते. संगीताचा गाभा आणि त्याचा आविष्कार यांच्या दरम्यानच्या प्रक्रिया इथे बाजूला सरल्या जातात कारण गायिकेचा आवाज अगदी सहज भावनेपर्यंत पोहोचतो!!
दुसरे अनन्यसाधारण वैशिष्ट्य सांगता येते – लालित्य!! अनेकदा सर्व कळतं किंवा सौंदर्यात्म प्रयत्नांचे लक्षण म्हणून लालित्याचा उल्लेख केला जातो. कोणतीही कला किंवा शैली असो, तिथे याच शक्ती कार्यरत असतात. त्यामुळे, कुठल्याही कृतीचे, कलाकृतीत रुपांतर होते, तिथे लालित्य अवश्यमेव आढळतेच!! व्यापक कलानुभव आणि सांस्कृतिक अर्थपूर्णता, या दृष्टीने, लताच्या गळ्यातील “लालित्य” हा अवाक करणारा अनुभव आहे.

आता इथे आणखी एका विवादास्पद मुद्द्याचा उहापोह करून, मी लेख संपवीत आहे. कलेची इतिश्री हि नेहमी सर्जकतेच्या पातळीवर बघणे जरुरीचे असते. लताच्या बाबतीत विचार करताना, तिच्या गायकीत सर्जनशीलता किती आहे? हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. म्हणजे बघा, चित्रपटात, प्रसंग कुणीतरी लिहिलेला असतो, त्यावर कुणीतरी अभिनय करणार असतो, त्यापुढे कवीचे शब्द येतात, त्यानंतर संगीतकाराची रचना अस्तित्वात येते!! म्हणजे, नकाशा हाताशी असतो!! लता फक्त त्या नकाशातील रस्त्यातून मार्ग आक्रमित असते!! म्हणजे ज्याला सर्जनशीलता म्हणता येईल, ती इथे कितपत योग्य ठरते? अर्थात, या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. कारण, हाच प्रश्न अभिनेत्याबाबत विचारला जाऊ शकतो!! प्रसंग लेखकाने निर्माण केलेला, संवाद लेखकाचे, प्रसंगाची जुळणी दिग्दर्शकाची, सोबत संगीताची साथ परिणामकारकता वाढवीत असते, तेंव्हा अभिनय कला देखील कितपत सर्जकतेच्या पातळीवर सिद्ध होते?
हातातील नकाशातून मार्ग आक्रमित इप्सित स्थळाशी पोहोचणे काही सहज शक्य नाही. वाटेत कितीतरी खाचखळगे पार करावे लागतात आणि ते खळगे, प्रत्यक्ष प्रवासाला आरंभ केल्याशिवाय समजणारे नसतात. म्हणजे त्या दृष्टीने सर्जकता जरूर आहे पण तिची प्रत कुठल्या पातळीवरील आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने, लताची गायकी, हे फार मोठे आव्हान आपल्यासमोर उभे करते, हे निश्चित!! म्हणजे परत प्रश्न असा, हे आव्हान पेलावयाचे कसे?

No comments:
Post a Comment