Sunday, 27 March 2022
भाषा आणि नाद
भाषा ही मूलतः संकेतात्मक आहे. त्यामुळे साहित्यकृतीचा आशय ह्या संकेतांच्या आधारानेच व्यक्त होतो. हे संकेत स्वभावतः अमूर्त असतात. आणि अप्रत्यक्षपणे म्हणजे पूर्वसंस्कार, कल्पनाशक्ती इत्यादींच्या साहाय्याने आपला आशय व्यक्त करतात. पण त्याचबरोबर हे देखील सत्य आहे, भाषेला एकप्रकारचा नाद असतो आणि त्या नादाचा अपरिहार्यपणे आपल्या मनावर संस्कार होत असतो. आपण जरी मूकपणे वाचत असलो तरी देखील आपल्यावर संस्कार होतच असतात.
कुठल्याही साहित्यिकाला या नादाचे अस्तित्व मान्य करावे लागते. इतकेच नव्हे, तार्त्याच्याशी नाते जुळवून घ्यावे लागते. हा नाद जो आपल्या आशय व्यक्त करायचा आहे, त्यात विक्षेप आणणार नाही. या उलट तो यथार्थपणे व्यक्त करण्यास मदत करील अशी योजना त्याला करावी लागते. विचारप्रधान लेखन करणाऱ्याने या नंदाच्या अनुकूल किंवा प्रतिकूल परिणामांकडे दुर्लक्ष केले तारू बरेचसे खपून जाऊ शकते. परंतु साहित्यिकाला जो आवश्य व्यक्त करायचा असतो, त्याचे स्वरूपाचं असे असते की, तो आशय व्यक्त करणाऱ्या भाषेच्या नादाच्या अनुकूल किंवा प्रतिकूल परिणामांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण त्याच साहित्याच्या द्वारे व्यक्त होणाऱ्या अनुभवात संवेदनांना आणि भावनांना किंवा खरे म्हणजे एका संपूर्ण मन:स्थितीला प्राधान्य असते आणि याच्याच चित्रीकरणावर भाषेच्या नादाचा अपरिहार्य परिणाम होतो. त्या नादाकडे लेखकाला आणि वाचकाला दुर्लक्ष करणे अशक्य होते.
भाषेला नाद असतो आणि त्याचा मनावर परिणाम होतो, हे जरी खरे असले तरी हा परिणाम आणि एखाद्या अर्थहीन नादाचा होणार परिणाम यांत मूलभूत फरक पडतो. भाषेचा नाद हा तिच्या आशयातून व्यक्त होत असतो. त्याचा अनावर होणार परिणाम हा बराचसा त्याला अनुलक्षून असलेल्या आशयाशी संबंधित असतो. त्याशिवाय, एकाच अक्षराचा किंवा अक्षरपंक्तीचा उच्चार देखील (प्रत्यक्ष किंवा मूकपणे) आशयानुरूप स्वतंत्र करणे शक्य असते आणि तास आपण तो करीत देखील असतो.
नादाच्या बाबतीत जी गोष्ट खरी तीच नादाच्या लयीच्या बाबतीत देखील खरी असते. साहित्यातल्या भाषेची लय आपल्याला जाणवते आणि यथार्थ वाटते, ती तिच्या आशयाचा संदर्भात. शिवाय एकाच वाक्याचा उच्चार वेगवेगळ्या लयीत करणे शक्य असते आणि तो कुठल्या लयीत करायचा हे आपण त्याच्या आशयानुसार ठरवतो. अधिक स्पष्ट मांडायचे झाल्यास, तो आशयच त्या वाक्याचा उच्चार अमुक एका लयीत करा असे आपल्याला दर्शवत असतो. लय आणि तालबद्धता यात जर आपण फरक केला तर लायोयीच्या बाबतीत जे विधान वर केले तेच तालबद्धतेच्या बाबतीत देखील लागू पडते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment